रानमेवा रुसल्याने आदिवासी चिंतीत 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 21 एप्रिल 2017

रसायनी - निसर्गाच्या लहरीपणाचा फटका यंदा जांभळे, करवंदे, काजू या रानमेव्याला बसला आहे. रसायनी परिसरात हा रानमेवा कमी प्रमाणात पिकल्याने शेतकरी व वाड्यांतील आदिवासी हिरमुसले आहेत. मोहोपाडा बाजारपेठेत आगदी तुरळक रानमेवा विक्रीसाठी येऊ लागला आहे. 

रसायनीलगतचा कर्नाळा किल्ला आणि पाताळगंगातील घेरामणिक गडाच्या डोंगररांगात अनेक आदिवासी वाड्या आहेत. यातील अनेक आदिवासींना उपजीविकेचे ठोस साधन नाही. हे आदिवासी तसेच खेड्यातील काही शेतकरी उन्हाळ्यात जांभळं, करवंदं, आंबे, काजू आदी जंगलातील रानमेवा विकून घरखर्चाला हातभार लावतात. यंदा रानमेवा रुसल्याने उन्हाळ्यातल्या या उत्पन्नाला मुकावे लागते की काय, ही चिंता त्यांना सतावते आहे. 

मागील वर्षी पाऊस चांगला झाला. त्यानंतर थंडीही चांगली पडली. फळबागांसाठी अनुकूल वातावरण होते; मात्र मध्येच थंडीत धुके पडू लागले. अगदी सुरुवातीला मोहोर येण्याच्या काळात खराब हवामानाचा झाडांवर परिणाम झाला. त्यामुळे कमी मोहोर आला, असे जाणकारांचे म्हणणे आहे. 

रानमेव्याचे दर 
 जांभूळ : ८० रुपये किलो. 
 करवंदाचा वाटा दहा रुपयात.

Web Title: Ranmeva adivasi