आगरी-कोळी भाषेला रॅपचा तडका

aagri-koli-rap-song
aagri-koli-rap-song

पाली - आगरी-कोळी भाषेतील गाणी सर्वत्र लोकप्रिय आहेत. मात्र या भाषेला रॅपचा तडका देण्याचे काम केले आहे "सर्वेश तरे" युवा कलाकाराने. त्याच्या आगरी-कोळी भाषेतील पहिल्या रॅप गाण्याचे शूटिंग नुकतेच अलिबाग व मांडव्याच्या किनाऱ्यावर झाले. येत्या रविवारी (ता.20) हे गाणे प्रसिद्ध होणार आहे.

महाराष्ट्राला लोकसंस्कृतीचा मोठा वारसा लाभलाय. त्या लोकगीताचे अनेक प्रकार आहेत. सध्या भारतात रॅप संगीताची संस्कृती जोमात आहे. येथील रॅप गाण्यांत मुंबईच्या बम्बईया भाषेला फार महत्व आहे. हैद्राबादची उर्दु, हिंदी आणि किंचीतसी मराठी या भाषा मिळुन ही ‘बम्बईया’ भाषा तयार होते. आणि याच भाषेला मुंबईची मुळ भाषा व बोली समजली जाते. हे समीकरण खोडत काढत मुंबईत हजारो वर्षापासुनचे स्थानिक असलेले आगरी-कोळी बांधवांची ‘आगरी-कोळी’ बोली ही मुळ मुंबईची खरी बोली आहे. हे सांगण्यासाठी ठाण्यातील युवा गीतकार-संगीतकार सर्वेश तरे यांनी संपुर्णत: आगरी-कोळी भाषेतील रॅप ची निर्मीती केली आहे. सर्वेश तरे यांनी या आधी शाहीर नंदेश उमप यांच्या सोबतही लोकगीते केली आहेत. त्याचबरोबर त्यांनी केलेल्या प्रेमगीताला युट्युबवर लाखो हिट्स आहेत. या रॅपला संगीत संयोजन भाग्येश पाटील आणि धनराज देवडीकर यांनी केले आहे. दिगदर्शन रिध्देश तरे यांनी केले आहे.

गाण्याचे संपुर्ण चित्रीकरण अलिबाग आणि मांडवा येथे झाले आहे. येत्या रविवारी (ता.20) आगरीबॉय या नावाच्या युट्यूब चॅनलवर ‘योच तो आगरीबॉय’ हा रॅप प्रदर्शीत होत आहे.

हे रॅप गाणे सावन. कॉन, कॉन आयट्युन,ऍमेझॉन अश्या १५ हुन अधिक संकेतस्थळांवर उपलब्ध होणार आहे. हे रॅप संपुर्णत: आगरी-कोळी भाषेत असले तरी इतरांनाही ही भाषा कळावी यासाठी गीत हिंदी-ईंग्रजी शीर्षकासहीत येणार आहे. याचे भाषांतर माधुरी हरड यांनी केले आहे.

तरुण पिढी समोर भाषा अणायची म्हणजे तिही त्यांच्या आवडीच्या विषयानेच! युवा पिढीचा आवडीचा एक विषय म्हणजे "रॅप". जर आगरी - कोळी भाषा ही नवीन व रंगतदार रित्या युवा पिढीच्या समोर आणली तर नक्किच युवा पिढी त्याचे स्वागत करेल व भाषाही टिकवेल. आगरी-कोळी भाषेत रॅप तयार केलाय एका आगरी - कोळी युवा कलाकार "सर्वेश तरे" याने.

राष्ट्रपती बराक ओबामा व त्यांच्या पत्नी मिशेल मुंबईत आल्या असतांना वेसावकर मंडळी कृत "मी हाय कोळी" ह्या सुप्रसिद्ध कोळी गीताच्या ठेक्यावर नाचले होते. मुंबई शहराची मुळ भाषा म्हणजे आपली आगरी - कोळी मायबोलीतील भाषा ही जगा समोर व नव्या पिढीसमोर पुन्हा नवीन रंगतदार रुपात येणे गरजेचे आहे व तरच ती मुंबई भूमितील भाषा टिकेल व तिचा योग्य प्रचार व प्रसार होइल.
- वेसावकर मंडळी, मुंबई

आगरी-कोळी बोली ही हिपहॉप संगीताच्या माध्यमातही बसवता येऊ शकते. आणि तीच खरी मुंबईची बोली आहे हे सांगण्यासाठी त्या गीताची निर्मीती केली आहे.
- सर्वेश तरे, आगरी-कोळी भाषेतील पहिला रॅप बनविणारे तरुण कलाकार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com