लग्नाच्या आमिषाने तरुणीवर बलात्कार

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 5 ऑगस्ट 2018

मालवण - शहरातील एका तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर बलात्कार, मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी केदार मिलिंद झाड (रा. वायरी भुतनाथ) या तरुणाविरुद्ध येथील पोलिस ठाण्यात रात्री उशिरा बलात्कार, मारहाण प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. याबाबतची फिर्याद पीडित तरुणीने काल रात्री दिली.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी - वायरी भुतनाथ येथील केदार झाड या तरुणाची एका तरुणीशी २०१६ मध्ये मैत्री झाली. या मैत्रीचा फायदा उठवत त्याने ११ एप्रिल २०१७ ला कणकवली येथे तिच्या रूमवर शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्यानंतर त्याचे त्या तरुणीशी सातत्याने शारीरिक संबंध सुरू होते. १४ एप्रिल २०१७ ला तो तिला दिल्ली, कुलूमनाली येथे फिरण्यास घेऊन गेला. तेथेही त्याने तिच्याशी सातत्याने शारीरिक संबंध ठेवले.

४ जून २०१७ ला त्याने आपल्या मित्रासह त्या तरुणीला सावरवाड येथील गणपती मंदिरात नेऊन कुंकू लावून, मंगळसूत्र घालून विवाह केला. त्यानंतर १६ जूनला केरळ येथे हनिमूनला नेले. त्यानंतर एप्रिल २०१८ पासून केदार याने त्या तरुणीशी बोलण्याचे टाळले. याच काळात त्याचे अन्य एका मुलीशी प्रेम प्रकरण सुरू असल्याची माहिती पीडित तरुणीला मिळाली. त्यामुळे त्यांच्यात भांडण झाले. यात केदारने तिला मारहाण केली. जीवे मारण्याची धमकी दिली. 

या प्रकरणी विवाहाचे आमिष दाखवून आपल्याला धोका दिल्याप्रकरणी पीडित तरुणीने आज रात्री येथील पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी केदार झाड याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिस निरीक्षक विनीत चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक सचिन पाटील अधिक तपास करीत आहेत.

Web Title: rape on girl in Wayari Bhutnath