मतिमंद मुलीवर अत्याचार करणाऱ्याला 10 वर्षे सक्तमजुरी 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 9 ऑक्टोबर 2019

रत्नागिरी - पीडित अल्पवयीन मतिमंद मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या तरुणाला न्यायालयाने 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली. 

रत्नागिरी - पीडित अल्पवयीन मतिमंद मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या तरुणाला न्यायालयाने 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली. 

विकास शांताराम शिंदे (वय 28) असे आरोपीचे नाव असल्याचे पोलिसांनी सांगितले. ही घटना तालुक्‍यातील ग्रामीण हद्दीत 17 मे ते जून 2017 या कालावधीत घडली. आरोपी हा पीडित अल्पवयीन मतिमंद मुलीच्या घरी येत-जात होता. त्या वेळी लैगिंक अत्याचार करीत होता. त्यात ती गरोदर राहिल्याचे तपासणीत उघड झाले.

पीडित मुलीच्या आईने ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पोलिस उपनिरीक्षक चित्रा मढवी तपास करीत होत्या. तपासात पोलिसांनी आरोपी शिंदे यास अटक केली होती. दोषारोपपत्र न्यायालयात दाखल करण्यात आले. आज या खटल्याचा निकाल अतिरिक्त सत्र न्यायाधीशांच्या न्यायालयात झाला.

न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवत 10 वर्षे सक्तमजुरी, 20 हजार रुपये दंड, दंड न भरल्यास सहा महिन्यांची साधी कैद सुनावली. सरकार पक्षातर्फे पाच डॉक्‍टरांसह एकूण 15 साक्षीदार तपासण्यात आले. सरकारी अभियोक्ता म्हणून ऍड. पुष्पराज शेट्ये यांनी, तर पहरवी अधिकारी म्हणून अनंत जाधव यांनी काम पाहिले. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: rape incidence in Ratnagiri prisoner 10 years servitude