गतिमंद अल्पवयीन मुलीवर बलात्कार

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 14 डिसेंबर 2018

रत्नागिरी - तालुक्‍यातील एका गतिमंद अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा प्रकार उघड झाला. पीडित पाच महिन्यांची गरोदर असून, पोलिसांनी एका तरुणाला अटक केली आहे. यामध्ये आणखी काहीजण असल्याचा संशय ग्रामस्थांनी व्यक्‍त केला असून, हे प्रकरण दडपण्यासाठी काही स्थानिक पुढाऱ्यांनी पीडितेच्या कुटुंबीयांना धमकी दिल्याने वातावरण तापले होते.

या प्रकरणी विनोद सदाशिव वाकोडे (सध्या रा. कोकणनगर, वाटद- खंडाळा) याला जयगड पोलिसांनी अटक केली आहे. संबंधित मुलीच्या भावाने फिर्याद दिली दिली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी ः हा प्रकार सप्टेंबर २०१८ मध्ये घडला होता. गणेशोत्सवातील कार्यक्रमावेळी वाकोडेने शंभर रुपये देऊन ‘तुला घरी सोडतो,’ असे सांगत तिच्यावर अत्याचार केला. तसेच हा प्रकार कुणालाही सांगू नकोस, अशी धमकीही दिली होती. त्यानंतर दर पंधरा दिवसांनी त्याने चार ते पाच वेळा अत्याचार केल्याचे तक्रारीत नमूद केले आहे.

अत्याचार प्रकरणी एकाला अटक केली आहे. या प्रकरणाचा कसून तपास केला जाईल.
- इंद्रजित काटकर
, पोलिस निरीक्षक, जयगड

वैद्यकीय उपचारासाठी नेण्यात आल्यानंतर ती गरोदर असल्याचे निदान झाले. ग्रामस्थांनी त्या कुटुंबाच्या मागे उभे राहत अत्याचार करणाऱ्याविरोधात आवाज उठविला आहे. न्यायालयाने आज वाकोडेला सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. त्याच्याविरोधात पॉस्कोअंतर्गत कारवाई केली आहे. पोलिस निरीक्षक इंद्रजित काटकर यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे. पीडितेचा भाऊ वेटरचे काम करतो. त्यांची घरची परिस्थितीही अत्यंत हलाखीची आहे.

Web Title: Rape on minor girl