मालवण येथे तीन वर्षीय मुलीवर वृद्धाकडून अत्याचार

प्रशांत हिंदळेकर
सोमवार, 13 ऑगस्ट 2018

मालवण - शहरातील एका तीन वर्षीय मुलीवर एका वृद्धाने अत्याचार केल्याची घटना आज उघडकीस आली. या प्रकारामुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पीडित बालिकेच्या आईने येथील पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी संशयित आरोपी फ्रान्सिस बस्त्याव रेबेलो (वय - 66, रा. मेढा) याला ताब्यात घेतले. 

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी - पीडित बालिका काल दुपारी तीन वाजता संशयित आरोपी फ्रान्सिस रेबेलो याच्या घरी खेळण्यासाठी गेली होती. त्यावेळी त्याने तिच्यावर अत्याचार केला. हा प्रकार कुटुंबीयांच्या लक्षात येताच त्यांनी आज येथील पोलिस ठाण्यात धाव घेत फ्रान्सिस रेबेलो याच्याविरोधात तक्रार दिली. पोलिसांनी फ्रान्सिस याला ताब्यात घेत त्याच्यावर लैंगिक अपराधापासून बालकांचे संरक्षण अधिनियम 2012 चे कलम 2/8, बलात्कार तसेच अन्य कलमांन्वये गुन्हा दाखल केला आहे. दुपारी तीननंतर त्याला जिल्हा विशेष न्यायालयात हजर करण्यात आले. 

अधिक तपास पोलिस निरीक्षक विनीत चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक रेश्मा मोमीन करत आहेत. लहान बालिकेवर झालेल्या या अत्याचाराच्या प्रकाराने शहरातून तीव्र संताप व्यक्त होत आहे. 

Web Title: rape on three years girl in Malvan