अरेच्चा ! येथे आढळला सोनेरी रंगाचा दुर्मीळ कोष्टी 

Rare Golden Color Spider Found In Kashedi Ghat Ratnagiri Marathi News
Rare Golden Color Spider Found In Kashedi Ghat Ratnagiri Marathi News

खेड ( रत्नागिरी ) :  मुंबई - गोवा महामार्गावरील कशेडी घाटात सोनेरी रंगाचा दुर्मीळ कोष्टी (स्पायडर) आढळून आला आहे. हा दुर्मीळ कोष्टी कशेडी घाटात कसा आला, आपल्या भागात अशा प्रकारचा कोष्टी आढळतो का, याबाबत कीटक अभ्यासकांची मदत घेतली जात आहे. 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कशेडी घाट येथे पोलिस बंदोबस्त ठेवला आहे. पोलिस उपनिरीक्षक या ठिकाणी कर्तव्य बजावत असताना त्यांना हा सोनेरी रंगाचा दुर्मीळ कोष्टी आढळून आला. कोकणात आतापर्यंत दोन प्रकारचे कोष्टी आढळून आले आहेत. पहिला कोष्टी आपले घर किंवा आजूबाजूच्या परिसरात तंतूचे जाळे विणणारा असतो. हा कोष्टी आकाराने लहान असतो तर दुसरा रानात दोन झाडांमध्ये जाळे विणून राहतो. हा कोष्टी आकाराने मोठा असतो. मात्र, या दोन्ही कोष्ट्यांचा रंग एकसारखाचा असतो.पण हा कोष्टी रंगाने सोनेऱी असल्याने याबाबत उत्सुकता वाढली आहे. पोलिस उपनिरीक्षक कदम यांना आढळून आलेला हा कोष्टी रंगाने अगदीच वेगळा असल्याने हा कोष्टी नेमका या भागात आला कुठून? याचा शोध घेतला जात आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com