रसायनी प्रकल्पग्रस्त शेतकरी व विकास सामाजिक संस्थेचे 'धरणे आंदोलन'

लक्ष्मण डुबे 
शनिवार, 24 मार्च 2018

रसायनी (रायगड) : रसायनी प्रकल्पग्रस्त शेतकरी विकास सामाजिक संस्था रसायनी यांच्या वतीने एचओसी कंपनीला शासनाने जमीन विक्रीला दिलेली परवानगी रद्द करावी आणि कंपनीने न वापरलेली जमीन परत मिळाव्यात या मागणीसाठी कंपनीच्या प्रवेशद्वारा समोर आज शुक्रवारी (ता. 23) पासुन 'धरणे आंदोलन' सुरू केले आहे. त्वरीत मागण्या मान्य कराव्यात अन्यथा मंगळवार (ता. 27) पासुन बेमुदत उपोषणचा इशारा देण्यात आला आहे. आज आंदोलनाचा दुसरा दिवस आहे. 

एचओसी कंपनीसाठी संपादित केलेली मात्र न वापरलेली जमीन मुळ मालकांना परत मिळाव्यात आशी मागणी आहे. गेली १२ वर्षा पासुन संस्था पाठपुरावा करत आहे. या मागणी बाबत शासन स्तरावर चर्चा बैठका झाल्या आहेत. आजपर्यंत निर्णय झाला नाही. दरम्यान आर्थिक संकाटात सापडलेला एचओसी कारखाना बंद होणार आहे. कंपनीने शिल्लक जमीन बीपीसीएला विकण्याचा निर्णय झाला आहे. तसेच विधीमंडळ अधिवेशनात येथील जमीन मुळ मालकांना परत देता येणार नाही दिलेली असे सरकारने स्पष्ट केले आहे. शासनाच्या या निर्णयामुळे रसायनी प्रकल्पग्रास्तांन मध्ये तिव्र असंतोष पसरला आहे. शासनाने कंपनीला जमीन विक्रीस दिलेली परवानगी  रद्द करावी तसेच कंपनीने न वापरलेली जमीन परत मिळाव्यात या मागणीसाठी प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी आज पासुन धरणे आंदोलन सुरू केले आहे. या मागण्या त्वरीत मान्य कराव्यात अन्यथा मंगळवार पासुन बेमुदत उपोषणाचा इशारा आज आंदोलन कर्त्यांनी दिला आहे. 

दरम्यान आंदोलनासाठी कंपनी पर्यंत जाताना प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी सक़ाळी फेरी काढली. या फेरीत मार्ग वरील चांभार्ली, शिवनगर, नवीन पोसरी, वासांबे मोहोपाडा, आळी आंबिवली, खाने आंबिवली, पराडे, दापिवली, वावेघर या गावांतील शेतकरी  सामील होत गेले. 

आंदोलन स्थळी कार्यक्रमात संस्थेचे सचिव काशीनाथ कांबळे यांनी प्रास्ताविक केले तर यावेळी सावळे गावचे माजी सरपंच गणपत केदारी, कामगार नेते महेंद्र घरत, माजी आमदार विवेकानंद पाटील, संस्थेचे उपाध्यक्ष रमेश पाटील, सहसचिव समीर खाने आदीची भाषण झाली. यावेळी संस्थाचे अध्यक्ष तात्यासाहेब म्हसकर, माजी अध्यक्ष किसन ठाकुर, सचिव काशीनाथ कांबळे, उपाध्यक्ष रमेश पाटील, सहसचिव समीर खाने, खजिनदार दत्तात्रेय शिंदे तसेच परीसरातील आजी माजी पंचायत समिति, जिल्हा परिषद सदस्य, ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसंरपच, सदस्य तसेच मोठ्या संख्याने पकल्पग्रस्त शेतकरी, नागरिक आदि उपस्थित होते. यावेळी रसायनी पोलीसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. 

Web Title: Rasayani project affected farmers on agitation