rasayni
rasayni

रसायनी (रायगड) - रसत्यावरील मोठ्या खड्याने वाहन चालक त्रस्त

रसायनी (रायगड) वासांबे मोहोपाडा येथील पाताळगंगा औद्योगिक क्षेत्रातील कामगार वसाहतीतील जनता विद्यालय आणि ज्युनिअर काँलेजच्या प्रवेशव्दारा समोर मोठा खड्डा पडला आहे. तसेच पावसाचे पाणी साचले की हा खड्डा एखाद्या तळ्या प्रमाणे दिसतो. तर हा धोकदायक खड्डा जाताना जिवघेणे ठरू शकतो आशी भिती वाहन चालक व्यक्त करत आहे. 

कामगार वसाहतीतील जनता विद्यालय आणि ज्युनिअर काँलेजात मराठी व इंग्रजी माध्यमात सुमारे दोन हजार दोनशे विद्यार्थी शिकत आहे. असे सांगण्यात आले. या आणि ओम बालविकास मंदिरात हजारो विद्यार्थी व पालक यांची तसेच एच पी गँस केंद्र, मोहोपाडा टपाल कार्यालय आदि ठिकानी जाताना नागरिकांची या वसाहतीतील रस्त्यावरून नेहमी वर्दळ असते. 

येथुन जाताना खड्डयांत वाहन आदळत असल्याने पालक तिव्र संताप व्यक्त करत आहे. तसेच  खड्डयांमुळे गंभीर स्वरूपाच्या अपघाताची भिती व्यक्त होत आहे. तर एमआयडीसी येथील खड्डे बुजविण्याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप रहिवाशांनी केला आहे. शाळे समोरील आणि इतर ठिकानचे खड्डे बुजविण्यात यावेत आशी मागणी सामाजिक कार्यकर्ते अशिष कवळे यांनी केली आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com