रायगड - सुधागड तालुक्यात शेकाप, राष्ट्रवादीची सरशी

अमित गवळे
सोमवार, 28 मे 2018

पाली (रायगड) : सुधागड तालुक्यातील सार्वत्रिक ग्रामपंचायत निवडणुकीत 14 पैकी 11 ग्रामपंचायतीसाठी रविवारी (ता.27) मतदान पार पडले. या ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल सोमवारी (ता. 28) पाली तहसिलकार्यालयात जाहीर करण्यात आला. या ग्रामपंचायत निवडणुकीत शेतकरी कामगार पक्ष व राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाने आपले वर्चस्व दाखविले. 

सुधागड तालुक्यातील 14 ग्रामपंचायत निवडणुकीत पाली ग्रामपंचायत वगळता इतर 13 ग्रामपंचायत निवडणुकीत नांदगाव व गोमाशी ग्रामपंचायत शेतकरी कामगार पक्षाने बिनविरोध निवडून आणली. नांदगाव सरपंचपदी शे.का.पक्षाच्या सोनल ठकोरे यांची तर गोमाशी सरपंचपदी पुजा पवार यांची बिनविरोध निवड झाली. तर भार्जे ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीने सत्ता काबीज केली. उवर्वीत 11 ग्रामपंचायतीसाठी निवडणुका पार पडल्या. या निवडणुकीत आघाडीचे मारत 9 सरपंच निवडून आले. तर परळी ग्रामपंचायती वर शेतकरी कामगार पक्ष व राष्ट्रवादी कॉग्रेस पुरस्कृत महापरिवर्तनवादी आघाडीचा सरपंच निवडून आला.  

शिवसेनेचा सुपडा साफ
परळी या सर्वात मोठ्या व प्रतिष्ठेच्या मानल्या जाणार्‍या तसेच शिवसेना रायगड जिल्हाप्रमुख प्रकाश देसाई यांच्या बालेकिल्ला समजला जाणार्‍या परळी ग्रामपंचायतीत शेतकरी कामगार पक्ष व राष्ट्रवादी कॉग्रेस पुरस्कृत महापरिवर्तनवादी आघाडीने सत्ता काबीज केली आहे. शिवसेना जिल्हाप्रमुख प्रकाश देसाई यांनी परळी ग्रामपंचायत निवडणुक जिंकण्यासाठी प्रतिष्ठा पणाला लावली होती. तालुक्यात शिवसेनेचा एकही सरपंच निवडून आला नाही.
 
Web Title: rashtravadi and shetkari kamgar paksh wins in sudhagad in raigad