जागतिक रँकींगमध्ये मुंबईची पीछेहाट झाल्याने स्वतंत्र कोकण विद्यापीठ मागणीला जोर

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 11 जून 2018

रत्नागिरी - जगभरातील उच्च शिक्षण संस्थांचे लक्ष लागून राहिलेले जागतिक क्यू एस रँकिंगच्या पहिल्या दीडशे क्रमवारीत भारतातील एकही संस्था नाही. मुंबई आयआयटी 162 व्या स्थानावर तर मुंबई विद्यापीठ 800 ते 1000 च्या क्रमवारीत घसरले आहे. मुंबईची ही पीछेहाट होताना स्वतंत्र कोकण विद्यापीठाच्या मागणीला पुन्हा एकदा जोर मिळाला आहे.

रत्नागिरी - जगभरातील उच्च शिक्षण संस्थांचे लक्ष लागून राहिलेले जागतिक क्यू एस रँकिंगच्या पहिल्या दीडशे क्रमवारीत भारतातील एकही संस्था नाही. मुंबई आयआयटी 162 व्या स्थानावर तर मुंबई विद्यापीठ 800 ते 1000 च्या क्रमवारीत घसरले आहे. मुंबईची ही पीछेहाट होताना स्वतंत्र कोकण विद्यापीठाच्या मागणीला पुन्हा एकदा जोर मिळाला आहे. कोकणातील सर्व आमदार, शिक्षकसंस्थांनी याबाबत मागणी केली आहे. 

क्वाक्वारेली सायमंड्स (क्यूएस) ही ब्रिटीश कंपनी दरवर्षी जगातील विद्यापीठांचे मानांकन जाहीर करते. संशोधन, सोयीसुविधा, लोकप्रियता यांच्यावर रँकिंग निश्‍चित केले जाते. या रँकींगमध्ये मॅस्यच्युसेटंस इन्स्टीट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (एमआयटी), स्टँडफर्ड, हॉवर्ड, कॅलिफोर्निया, ऑक्सफर्ड ही पाच विद्यापीठे पहिल्या क्रमवारीत आहेत. या तुलनेत मुंबई विद्यापीठाचे रँकिंग खूपच तळाला आहे. विद्यापीठाचा जगात उच्च दर्जा, प्रतिष्ठेचा बुरखा फाटला असून रँकिंगमुळे सत्य जनतेसमोर आले. ऑक्सफर्डसहित सर्व विद्यापीठे छोटी आहेत.

डॉ. ताकवले तसेच त्यागराजन समितीत छोट्या विद्यापीठांची गरजेची शिफारस केली. कोकणातील सर्व आमदार, शिक्षणसंस्था, विद्यार्थी यांनी एकमुखाने कोकण विद्यापीठाची मागणी केली. टिळक-आंबेडकरांच्या कोकणात स्वतंत्र विद्यापीठ झाल्यास विद्यार्थ्यांना स्वतःचे शैक्षणिक व्यासपीठ उपलब्ध होईल. विचार करू, असे शासनाकडून सांगितले जात आहे. कोकणातील आमदारांनीही मागणी केली आहे.

कोकणच्या शैक्षणिक हितासाठी विद्यापीठाची मागणी केली. 100 महाविद्यालयांची छोटी-छोटी विद्यापीठे करण्याचा वरदराजन समितीचा निकष कोकणातील महाविद्यालये पूर्ण करत आहेत. रत्नागिरी, सिंधुदुर्गमधील लोकप्रतिनिधींनी पाठिंबा दिला आहे.”

- अ‍ॅड. विलास पाटणे,

अध्यक्ष, कोकण विद्यापीठ कृती समिती.

Web Title: Ratmagiri News sepeate Konkan University demand