Ratnagiri Dam Mishap : दहा जणांसाठी शुभम देवदूत

Ratnagiri Dam Mishap : दहा जणांसाठी शुभम देवदूत

चिपळूण - तिवरे-भेंदवाडी येथे पोफळीतील पाचजण पाहुणे म्हणून गेले होते. त्यापैकी चौघेजण वाहून गेले. शुभम मानकर (वय २१) हा तरुण वाचला. त्याने भेंदवाडीतील दहा जणांचे जीव वाचवले; मात्र तो सहकाऱ्यांना वाचवू शकला नाही. त्यांच्या शोधासाठी रात्रभर त्याने तिवरेचा परिसर पिंजून काढला. 

पोफळीतील राकेश घाणेकर (३०), सुशील पवार (३२), रणजित काजवे (३२), बुबा निकम (३४) आणि शुभम मानकर (२१) रात्री पाहुण्यांकडे गेले होते. धरणाच्या पायथ्याशी असलेल्या तानाजी चव्हाण यांच्या घरात त्यांचे जेवण सुरू असताना धरण फुटल्याची ओरड झाली. सुरवातीला ही अफवा असेल म्हणून घरातून कोणी बाहेर पडले नाही; मात्र रवींद्र चव्हाण हे धाव ठोकत तानाजी चव्हाण यांच्या घरात आल्यानंतर त्यांना धरण फुटल्याची खात्री पटली. ते घरातून बाहेर येईपर्यंत धरणाचे पाणी त्यांच्या घरापर्यंत येऊन ठेपले होते. पाण्याचा वेग मोठा होता.

प्रवाहातून बाहेर येण्याचे आव्हान त्यांच्यासमोर होते. घरातील लोक सामान घेऊन बाहेर पडण्याचा प्रयत्न करत होते. यावेळी शुभम मानकरने दहा जणांना पाण्यातून मार्ग काढत वाचवले. राकेश घाणेकर, सुशील पवार, रणजित काजवे आणि बुबा निकम यांना शुभमने गाडीत बसण्याची सूचना केली. मात्र, पाण्याचा प्रवाह जबरदस्त होता. पाण्याच्या वेगामुळे गाडी जाग्यावरून हलत नव्हती. त्यामुळे आपण गाडीने पुढे जाऊ शकत नाही, असा समज करून चौघेजण सैरावैरा पळाले. या दरम्यान शुभम गाडी घेऊन पुढे आला. गाडी सुरक्षित ठिकाणी लावून त्याने मित्रांचा शोध घेण्यास सुरवात केली. पहाटेपर्यंत तो मित्रांचा शोध घेत होता. सकाळी साडेआठच्या दरम्यान राकेश घाणेकर याचा मृतदेह सापडला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com