रत्नागिरी : ध्यास प्लास्टिकमुक्तीचा; जागर पर्यावरणपूरकतेचा

निवेदिता प्रतिष्ठानचा उपक्रम; कचरासुद्धा कच्चा माल, अनेक वस्तू बनवल्या
प्लास्टिकमुक्तीचे नारे
प्लास्टिकमुक्तीचे नारे sakal

दाभोळ: प्लास्टिकमुक्तीचे नारे अनेकजण देत असतात; पण प्लास्टिकमुक्तीसाठी सातत्याने प्रयत्न करून त्यासाठी लोकसहभागही निर्माण करण्यात जालगाव येथील निवेदिता प्रतिष्ठान यशस्वी झाले आहे. प्लास्टिकचा पुनर्वापर, त्यापासून शोभिवंत फुले, गुच्छ, प्लास्टिकच्या विटा, त्यापासून मिळणारे तेल प्लास्टिकच्या विविध वस्तू, अगदी बाकड्यांपासून ते फूटपाथपर्यंत वस्तू त्यांनी बनवल्या आहेत. त्यामुळे बोलघेवडे पर्यावरणवादी न राहता त्यांनी प्रत्यक्ष कार्यक्रम आखला आहे. प्लास्टिकमुक्तीसाठी लोकसहभागातून काय करता येईल, याबाबतचे त्यांचे आराखडेही तयार आहेत. चिपळुणातील महापुरानंतर तेथे लक्षावधी प्लास्टिक बाटल्या जमा झाल्या. त्याची विल्हेवाट लावण्यातही प्रतिष्ठानचा सहभाग होता.

सुरुवातीला फक्त ‘प्लास्टिक कॅरिबॅग मुक्त मी’ असा विषय घेऊन जालगाव येथून सुरुवात केली. जालगाव व्यापारी संघटनेच्या व्यापाऱ्यांकडे आजही प्लास्टिक कॅरिबॅग नाही. २००९ मध्ये दापोली शहरातून ३१ ऑगस्टला मुसळधार पावसात महारॅलीने १ हजार २०० नागरिकांसमवेत प्लास्टिक कॅरिबॅग दापोली शहरातून हद्दपार करण्यात यश आले. मुरुड येथे किनारा स्वच्छता अभियानात टेलस ऑर्गनायझेशन पुणेसह संयुक्त उपक्रम करून तेथे पडलेल्या बाटल्या जमा करून तेथेच आमचे कार्यकर्ते बाटल्यांपासून बुके बनवत होते.

दुसऱ्या वस्तूचा कच्चा माल

जी वस्तू कचरा आहे, तिच्याकडे दुसऱ्या वस्तूचा कच्चा माल म्हणून पाहणे आवश्यक आहे. या दृष्टिकोनातून सर्व प्रकारचा कचरा कसा उपयोगात आणता येईल याची मॉडेल्‍सही तयार केली आहेत. इकोफ्रेंडली गुढीची निर्मिती केली. गुढीचा बेस पूर्णतः हलक्या प्लास्टिकचा आणि सिमेंट याचा वापर करून केला आहे. त्याचप्रमाणे या प्लास्टिकच्या कचऱ्यापासून विटा करण्यात यश मिळाले आहे.

कचरा समुद्रात जाण्यापासून वाचवतो

नागरिकांच्या घरातील कचरा त्यांनी स्वच्छ आणि वर्गीकरण करून निवेदिता प्रतिष्ठानच्या संकलन केंद्रात आणून द्यावा, असं आवाहन केलं आणि या आवाहनाला प्रतिसाद देऊन नागरिक दर शनिवार आणि रविवारी निवेदिताच्या केंद्रामध्ये आपल्या घरातला स्वच्छ केलेला प्लास्टिकचा कचरा घेऊन येतात. वर्षातून तीन ते चारवेळा हा कचरा पुनर्वापर प्रकल्पाकडे स्वनिधीतून आणि लोकवर्गणीतून पाठवला जातो. त्यामुळे प्रतिवर्षी आम्ही किमान एक टन कचरा समुद्रात जाण्यापासून वाचवतो, हे एक समाधान आहे.

डम्पिंग ग्राउंडमुक्त शहरनामा

आम्ही संपूर्णतः कचरामुक्त मी अभियानाच्या अंतर्गत प्रत्येक गाव, शहर आणि तालुका किंवा जिल्हाही प्लास्टिक कचरामुक्त करता येऊ शकतो, अशा पद्धतीचा आराखडा तयार केला आहे. त्याच्यामध्ये डम्पिंग ग्राउंडमुक्त शहरनामा असा एक विषय आम्ही घेतला आहे. प्लास्टिकच्या विळख्यातलं पाणी या विषयाअंतर्गत नागरिकांचे प्लास्टिक कचऱ्याबाबत मत बदलण्यात आम्हाला यश प्राप्त होत आहे.

पुरानंतर १ लाख बाटल्यांचे संकलन

चिपळूण येथील महापुरानंतर चिपळूण येथे पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण झाल्यावर लाखोंच्या संख्येने पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या चिपळूणमधील नागरिकांना वाटण्यात आल्या. त्यातील बहुतांश रिकाम्या बाटल्या कचरा म्हणून डम्पिंग ग्राउंडवर गेल्या. चिपळूणच्या महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी व सह्याद्री प्रतिष्ठानच्यावतीने १ लाख प्लास्टिक बाटल्यांचे संकलन करून त्या मुंबई व पुणे येथे पाठवल्या. रत्नागिरीतील औद्योगिक वसाहतीत संकलन केंद्र उभारण्यात आले असून, रत्नागिरीतील हॉटेलमधून जमा होणाऱ्या प्लास्टिक बाटल्या रत्नागिरी येथेच क्रश करून मुंबई व कोल्हापूर येथे पाठवण्यात येतात.

प्लास्टिक बॉटल संकलन करण्याकरिता

  • काय काय बनवलंय प्लास्टिकपासून

  • दापोली पोलिस ठाण्यात कायद्याचं म्युझियम

  • कचऱ्यातून सौंदर्यनिर्मिती प्रकल्प उभारला

  • प्लास्टिकच्या बाटल्यांच्या पुनर्वापरावर भर

  • कोणत्याही यंत्रसामुग्रीचा वापर न करता शक्य

  • बाकडी, स्टुल आणि फूटपाथ तयार केले

  • बस स्थानक, रेल्वेस्थानक, उद्यानात उपयुक्त

  • अभ्यागतांसाठी स्वागतकक्ष बनवला कचऱ्यातून

  • बाकड्यांसाठी बाटल्या, वेटलेस प्लास्टिक कचरा

  • प्लास्टिकच्या कचऱ्यापासून विटा करण्यात यश

असा होऊ शकतो पुनर्वापर

  • गाव तिथे प्लास्टिक कचरा संकलन केंद्र

  • तालुका तिथे प्लास्टिक पुनर्वापर प्रकल्प

  • पुनर्वापर प्रकल्प कोणत्या प्रकारचा असावा

  • पुनर्वापर प्रकल्पाकडून पॉली ऑईल मिळते

  • पॉली ऑईल डिझेल, रॉकेलला उत्तम पर्याय

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com