रत्नागिरी: इंग्लंडमध्ये जाणार हापूस; बागायतदार खूश | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 कृषी पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते मुंबईत एक्सपोर्ट हापूस आंब्याच्या पेटीचे अनावरण करण्यात आले.

रत्नागिरी: इंग्लंडमध्ये जाणार हापूस; बागायतदार खूश

रत्नागिरी: ग्लोबल कोकणतर्फे यंदा हॉलंड, लंडन येथे शेतकरी आंबा बाजार आयोजित करण्यात येणार असून कृषी पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते मुंबईत एक्सपोर्ट हापूस आंब्याच्या पेटीचे अनावरण करण्यात आले. कोकणातील शेतकऱ्‍यांचा हापूस आंबा थेट निर्यात करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. दरम्यान, कोकणातील हापूस आंबा इंग्लंडमधील नागरिकांना चाखायला मिळणार असल्याने कोकणवासीय समाधान व्यक्त करत असून आपल्या मातातील आंब्याला जागतिक बाजारपेठ मिळणार असल्याने बागायतदार मनोमनी खूश झाले आहेत.

सचिन शिनगारे, तेजस भोसले, सचिन कदम या मराठी तरुणांच्या मदतीने संपूर्ण युरोपमध्ये जर्मनी, हॉलंड आणि युनायटेड किंगडम या परिसरात थेट कोकणातून हापूस आंबा जाणार आहे. यूरोपच्या प्रगत बाजारपेठेत कोकणातील हापूस आंबा सहजपणे उपलब्ध व्हावा, याकरता ग्लोबल कोकणने पुढाकार घेतला आहे. प्रसिद्ध निर्यातदार डॉ. दीपक परब या अभियानाचे नेतृत्व करत आहेत. संपूर्ण भारतात हापूस आंब्याची बाजारपेठ विकसित करण्याबरोबरच संपूर्ण युरोप आणि जगभरात हापूस आंब्याची बाजारपेठ कोकणातील शेतकऱ्‍यांच्या माध्यमातून विकसित करण्याचे ग्लोबल कोकणने निश्‍चित केले आहे. उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी याला सहकार्य करण्यासह कृषी व पणन मंत्री बाळासाहेब पाटील, पणन सचिव अनुप कुमार यांच्या हस्ते ग्लोबल कोकणच्या आणि निर्यातीच्या हापूस आंब्याच्या पेटीचा आरंभ करण्यात आला आहे, असे ग्लोबल कोकणचे संजय यादवराव यांनी सांगितले.

मुंबई, पुण्यात आंबा महोत्सव

हापूस आंब्याच्या निर्यातीबरोबरच मुंबईत विविध मॉलमध्ये दर्जेदार हापूस आंबा महोत्सव आयोजित केला आहे. याबरोबरच मुंबई-अहमदाबाद हायवे तलासरी, मुंबई नाशिक मुंबई पुणे मुंबई कोकण अशा विविध हायवेवर शेतकरी आंबा बाजाराचे आयोजन करण्यात येणार आहे. या बाजारात शेतकऱ्‍यांचा आंबा थेट ग्राहकांना उपलब्ध होईल.

कोकण शेतकरी संघटना कार्यरत

कोकणातील सुमारे ५०० शेतकऱ्‍यांना एकत्र आणून हापूस आंब्याचे प्रमोशन आणि मार्केटिंग देशभरात, जगभरात केले जाणार आहे. याकरिता समृद्ध कोकण शेतकरी संघटना कार्यरत झाली असून कुणकेश्वर, विजयदुर्ग, राजापूर, आडिवरे, पावस, रत्नागिरी, गणपतीपुळे, गुहागर, दापोली, केळशी, श्रीवर्धन, अलीबाग, बाणकोट, वेंगुर्ला, मालवण येथील हापूस आंब्याची ब्रँड ग्लोबल कोकण विकसित करणार आहे.

एक नजर...

  • जर्मनी, हॉलंड आणि युनायटेड किंगडममध्ये जाणार हापूस

  • प्रसिद्ध निर्यातदार डॉ. दीपक परबांकडे अभियानाचे नेतृत्व

  • जगभरात हापूस आंब्याची बाजारपेठ विकसित करणार

  • कोकणातील सुमारे ५०० शेतकऱ्‍यांना एकत्र आणणार

  • हापूस आंब्याचे प्रमोशन, मार्केटिंग देशासह जगभरात

  • समृद्ध कोकण शेतकरी संघटनाही कार्यरत झाली

  • हापूस आंब्याची ब्रँड ग्लोबल कोकण विकसित करणार

Web Title: Ratnagiri Hapus Go England Gardener Happy

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :KokanRatnagirimangoFarmer
go to top