रत्नागिरी : काष्ठशिल्पाच्या छंदाने मिळाली जीवनाची दिशा

कोरोनाच्या कालावधी सर्वांनाच काहीतरी शिकवून गेला
कलाक्षेत्रात असलेल्या सर्वांनीच विविध कला जोपासल्या.
कलाक्षेत्रात असलेल्या सर्वांनीच विविध कला जोपासल्या.sakal

रत्नागिरी : कोरोनाच्या कालावधी सर्वांनाच काहीतरी शिकवून गेला. कलाक्षेत्रात असलेल्या सर्वांनीच विविध कला जोपासल्या. अगदी असेच साखरपा- मुरलीधरवाडी येथील सुनील गोपाळ पांचाळ - धोपीस्कर यांनी लहानपणी गौरीचे मुखवटे करत होते. कोरोना काळात साग आणि शिवणीच्या लाकडातून छत्रपती शिवाजी महाराज, साईबाबांचे काष्ठशिल्प तयार करून कोकणपट्ट्यात त्यांनी नावलौकीक मिळविला.

सुनील पांचाळ यांना पिढ्यांन्‌पिढ्या सुरू असलेल्या फर्निचर, घरबांणीच्या कामाचा अनुभव होता. फर्निचर तयार करण्याचे बाळकडू त्यांना वडिलांकडून मिळाले. साखरपा येथे असताना लहानपणी त्यांनी गणपतीसाठी गौरी (गवर) बनवली होती. त्यांच्या त्या काष्ठशिल्पाला जाणकारांनीही नावजले होते. पुढे कुटुंबाचा आर्थिक भार संभाळण्यासाठी फर्निचरचा व्यवसायासाठी मुंबई येथे गेले. तेथे दहा वर्षे पॅटन मेकर्सच्या व्यवसायात होते. पॅटन मेकर्सची चांगली माहिती त्यांना श्री. काणेकर यांच्याकडून मिळाली. या माहितीमुळे काष्ठशिल्प तयार करण्याचा त्यांचा मार्ग सुकर झाला होता. कालांतराने पॅटन मेकर्सचे काम बंद झाले. पुढे काय करावे, असा यक्ष प्रश्न त्यांच्यासमोर होता. पुन्हा त्यांनी फर्निचरचा व्यवसाय वृिद्धंगत केला होता. त्यानंतर लागलेल्या लॉकडाउनच्या काळात त्यांनी घरचा रस्ता धरला पुन्हा गावाकडे साखरपा येथे आले.

गावाला आल्यावर मिळालेला वेळ वाया जाऊ नये यासाठी त्यांनी छंदातून लाकडात छत्रपती शिवाजी महाराज, साईबाबांचे काष्ठशिल्प हुबेहूब तयार केले. पुणे, मुंबई, सांगली, सातारा, कराड येथून त्यांच्या कलेला दाद मिळाली. काष्ठशिल्पांचे दूरध्वनीवरून कौतुक केले. काष्ठशिल्पाचे कामही मिळाले. त्यांच्या या कलेमुळे त्यांच्या व्यवसाय वृद्धिंगत होण्यास मदत मिळाली असल्याचे श्री. पांचाळ यांनी सांगितले.

लाकडातून चेहऱ्याचे भाव उमटावे लागतात

फर्निचर व पॅटन मेकर्सच्या अनुभवातून काष्ठशिल्प तयार करण्यास मदत मिळाली आणि बालपणीच्या छंदाला चांगले वळण मिळाले. हे काम सोपे वाटत असेल तर तसे नाही. त्यासाठी अनुभव आणि चित्रानुसार लाकडात त्याचे भाव उतरावे लागतात, असे सुनील पांचाळ यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com