रत्नागिरी : समुद्रात बोटी न्यायच्या कशा?

डिझेलच्या भडक्याने नौका किनाऱ्यावरच; ३५ टक्के नौका समुद्रात, वाढीव दर न परवडणारे
बोटी
बोटीsakal

दाभोळ: होळी सणासाठी किनाऱ्‍यावर आलेल्या बोटींपैकी जेमतेम ३५ टक्के बोटी समुद्रात गेल्या आहेत. उर्वरित बोटी सहकारी संस्थांमार्फत दिल्या जाणाऱ्‍या डिझेलदराचा भडका उडाल्याने किनाऱ्‍यावरच आहेत. वाढलेल्या डिझेलमुळे मच्छीमार हवालदील असल्याने बोटी बंद ठेवण्याची वेळ अनेकांवर आली आहे. त्यामुळे मच्छीमारांवर उपासमारीचे संकट आले आहे. दरम्यान, डिझेलचे दर वाढत असल्याने समुद्रात बोटी न्यायच्या कशा, खलाशांचा पगार कसा द्यायचा? असा प्रश्न मच्छीमार बांधवांना पडला आहे

मासेमारी करणाऱ्‍या बोटींना सहकारी संस्थांमार्फत डिझेल पुरवठा होतो. त्याच संस्थांमध्ये शासनाकडून डिझेल परतावादेखील मिळतो; परंतु सहकारी संस्थामार्फत प्राप्त होणारे डिझेल व्यावसायिक कर लागू करू दिले जाणार आहे. हे वाढीव दराचे डिझेलमच्छीमारांना न परवडणारे असल्याने प्रचंड नाराजी व्यक्त होत आहे. मच्छीमारांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. मच्छीमारांच्या विविध मागण्यांकडे शासन दुर्लक्ष करत आहे.

काही दिवसांपूर्वीदेखील मच्छीमारांनी तहसील कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले व मागण्यांचे पत्र दिले. त्यातच पर्ससिननेट नौका राज्याच्या हद्दीत धुमाकूळ घालत असल्याने त्याचा फटका स्थानिक व पारंपरिक मच्छीमारांना बसत आहे. त्यातच आता समुद्रात वादळ निर्माण झाल्याने मासे मिळणेदेखील कमी झाले आहे.

खलाशांचा पगार कसा द्यायचा?

जिल्ह्याला वादळाचा तडाखा बसणार नसल्याने काही नौका मासेमारीसाठी गेल्या; परंतु डिझेलचे दर वाढत असल्याने समुद्रात बोटी न्यायच्या कशा, असा प्रश्न मच्छीमार बांधवांना पडला आहे. समुद्रात गेल्यावर अपेक्षित मासे न मिळाल्यास खलाशांचा पगार कसा द्यायचा? डिझेल खरेदी कशी करायची, असे प्रश्‍न मच्छीमारांसमोर आहेत. शासनाने तातडीने मच्छीमारांचे प्रश्‍न सोडवावेत, अशी मागणी मच्छीमार अनंत चोगले यांनी व्यक्त केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com