प्रत्येक तालुक्‍यात दहा मॉडेल अंगणवाड्या

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 22 जून 2017

पटसंख्या टिकविण्यासाठी प्रयत्न - सेसमधून निधीची तरतूद
रत्नागिरी - अंगणवाड्यांमधील मुलांची पटसंख्या टिकून राहावी, यासाठी जिल्हा परिषद महिला व बालकल्याण विभागाकडून प्रत्येक तालुक्‍यात दहा मॉडेल अंगणवाडी तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी जिल्हा परिषद सेसमधून निधीची तरतूद करण्यात आली आहे, 

पटसंख्या टिकविण्यासाठी प्रयत्न - सेसमधून निधीची तरतूद
रत्नागिरी - अंगणवाड्यांमधील मुलांची पटसंख्या टिकून राहावी, यासाठी जिल्हा परिषद महिला व बालकल्याण विभागाकडून प्रत्येक तालुक्‍यात दहा मॉडेल अंगणवाडी तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी जिल्हा परिषद सेसमधून निधीची तरतूद करण्यात आली आहे, 

अशी माहिती महिला व बालकल्याण अधिकारी एम. आर. आर्गे यांनी दिली.
जिल्ह्यात २ हजार ८६५ अंगणवाड्या आहेत. त्यापैकी २ हजार २६० नियमित, तर ६०५ मिनी अंगणवाड्यांचा समावेश आहे. यापैकी १ हजार ४१३ अंगणवाड्यांना हक्काची इमारत आहे. त्यातील ५८३ इमारती खासगी जागेत, ५७० प्राथमिक शाळांमध्ये आणि २९९ अंगणवाड्या समाजमंदिर आणि इतर ठिकाणी भरत आहेत. अंगणवाड्यांच्या इमारतीसाठी जागा उपलब्ध होत नाही. अनेक ठिकाणचे प्रस्ताव रखडले आहेत. सोयी-सुविधांचा अभाव आणि शहरी भागाजवळील गावातील पालक मुलांना इंग्रजी शाळांमधील नर्सरीत प्रवेश देतात. साडेतीन वर्षांपासूनची मुले नर्सरीत जात असल्याने त्यापुढील शिक्षण त्याच शाळांमध्ये होते. त्याचा परिणाम गावागावांतील अंगणवाड्यांवर होत आहे. अडीच वर्षांचे मूल अंगणवाडीत ठेवले जाते; परंतु वर्षभरातच त्याची रवानगी नर्सरीत केली जाते. सुविधांचा अभाव असल्याने वीस अंगणवाड्यांची पटसंख्या घटल्याचे पुढे आले आहे. सुमारे चारशे ते साडेचारशे मुले कमी दाखल झाली आहेत.अंगणवाड्यांची पटसंख्या कायम ठेवण्यासाठी प्रशासनाकडून पावले उचलली जात आहेत.

त्यासाठी मॉडेल अंगणवाडीचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. प्रत्येक तालुक्‍यात एक अंगणवाडी मॉडेल बनवली जाणार आहे. वर्गातील भिंतींवर मुळाक्षरे, अंक यासह शिक्षणासाठी आवश्‍यक ती माहिती पेंट केली जाईल. मुलांसाठी सुविधा दिल्या जातील.  मराठीबरोबरच इंग्रजीचेही शिक्षण देण्यात येणार आहे.

इमारतीची आवश्‍यकता
इमारतीची आवश्‍यकता असलेल्या अंगणवाड्यांमध्ये मंडणगड तालुक्‍यात ५७ अंगणवाड्या, दापोली ७०, दाभोळ ५२, खेड ९९, चिपळूण १- ६१, चिपळूण २-४४, गुहागर ६२, संगमेश्वर १२३, रत्नागिरी १-८७, रत्नागिरी २-७४, लांजा ४९ आणि राजापूर तालुक्‍यांतील ९८ अंगणवाडयांना हक्काच्या इमारतीची प्रतीक्षा आहे.

Web Title: ratnagiri konkan news 10 moden anganwadi