‘आदर्श शिक्षक’साठी २५ प्रस्ताव

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 22 ऑगस्ट 2017

मुलाखतीमधून निवड - दहा नावे कोकण आयुक्‍तांकडे

रत्नागिरी - जिल्हा परिषदेच्या आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी तालुकास्तरावरुन २५ प्रस्ताव शिक्षण विभागाला प्राप्त झाले होते. त्या शिक्षकांच्या मुलाखती आज घेण्यात आल्या. त्यातील दहा जणांची नावे निश्‍चित करून ती अंतिम मंजुरीसाठी कोकण आयुक्‍तांकडे पाठविण्यात आले आहेत.

मुलाखतीमधून निवड - दहा नावे कोकण आयुक्‍तांकडे

रत्नागिरी - जिल्हा परिषदेच्या आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी तालुकास्तरावरुन २५ प्रस्ताव शिक्षण विभागाला प्राप्त झाले होते. त्या शिक्षकांच्या मुलाखती आज घेण्यात आल्या. त्यातील दहा जणांची नावे निश्‍चित करून ती अंतिम मंजुरीसाठी कोकण आयुक्‍तांकडे पाठविण्यात आले आहेत.

आदर्श शिक्षक निवड समितीच्या अध्यक्षा सौ. स्नेहा सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली झाली. मुलाखत घेण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा, शिक्षण सभापती दीपक नागले, महिला व बालकल्याण सभापती तुजा खांडेकर, समाजकल्याण सभापती सौ. चारुता कामतेकर, माध्यमिक शिक्षणाधिकारी महेश जोशी, 

प्राथमिक शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर आणि प्रशिक्षण विद्यालयाचे प्राचार्य उपस्थित होते. यामध्ये प्रस्ताव प्राप्त झालेल्या २५ शिक्षकांच्या १५ मार्कासाठी मुलाखती घेण्यात आल्या. शाळांमध्ये राबविलेले उपक्रम, विद्यार्थी गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न, नवीन शैक्षणिक धोरणाची दिशा, सामान्य ज्ञान, व्यक्‍तिमत्व विकास अशा पाच मुद्द्यावर आधारित प्रश्‍न समितीकडून विचारण्यात आले. पुरस्कार देण्यापूर्वी शिक्षकांकडून मागील पाच वर्षांच्या कामाची फाईल मागविण्यात आली होती. त्यासाठी ८५ गुण ठेवण्यात आले आहेत. एकूण १०० गुण आहेत. गुणांकनाच्या आधारे नऊ तालुक्‍यातून प्रत्येकी एक आणि विशेष पुरस्कार अशा दहा जणांनी निवड आज करण्यात आली. त्याची अधिकृत घोषणा शिक्षक दिनी ५ सप्टेंबरला होणार आहे. तत्कालीन शिक्षण सभापती विलास चाळके यांनी पुरस्कारासाठी तालुकास्तरावरून जास्तीत जास्त प्रस्ताव यावेत असा निर्णय घेतला होता. तालुक्‍यातून एकच प्रस्ताव आला तर स्पर्धा होत नाही. अनेकवेळा तालुक्‍यातच प्रस्ताव निवड केली जात होती. त्यात अन्याय होण्याची शक्‍यताही होती. ती परंपरा विद्यमान शिक्षण सभापती दीपक नागले यांच्या कालावधीमध्येही सुरू आहे. प्रत्येक तालुक्‍यातून किमान २ तरी प्रस्ताव आले होते. काही तालुक्‍यातून चार प्रस्ताव होते. त्यामुळे निवड समितीपुढेही आव्हान होते.

Web Title: ratnagiri konkan news 25 proposal for aadarsh teacher