नरेगात आठ कोटी खर्ची

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 30 जून 2017

मागील वर्षभरात सव्वातीन लाख रोजगारनिर्मिती

रत्नागिरी - महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत (एमआरइजीएस) गेल्या पाच वर्षांपेक्षा २०१६-१७ या आर्थिक वर्षात ८३ टक्‍के अधिक काम पूर्ण झाले आहे. ३ लाख ११ हजार ७८८ मनुष्यदिन निर्मिती करताना ८ कोटी ६६ लाख रुपये खर्च टाकण्यात आले आहेत. २०११-१२ नंतर मनुष्यदिन निर्मितीत रत्नागिरी जिल्हा मागे होता. त्यानंतर वैयक्‍तिक लाभाच्या योजनांमुळे रोजगार निर्मितीत वाढ झाली आहे.

मनरेगा योजनेमध्ये २०११-१२ या आर्थिक वर्षात मनुष्यदिन निर्मितीवर दहा कोटी २९ लाख रुपये खर्च करण्यात प्रशासनाला यश आले होते. काम करा, अन्यथा कारवाई करू, असा बडगा शासनाने उगारल्यामुळे महसूलच्या अधिकाऱ्यांसह सर्वजण कामाला लागले होते. त्यावर्षी पाच लाख रोजगार निर्मिती करण्यात यश आले होते. त्यानंतर हळूहळू ती घटली. २०१५-१६ या वर्षात ९३ टक्‍केच लक्ष्य पूर्ण झाले. १६-१७ मध्ये १ लाख ७० हजार मनुष्यदिन निर्मितीचे लक्ष्य ठेवले होते. हे पूर्ण करण्यासाठी जिल्हा परिषद, कृषी विभागाने वैयक्‍तिक लाभांच्या योजना गावागावांत राबविण्यावर भर दिल्या होत्या. त्यात वृक्ष लागवड, रस्ते, शोषखड्डे, शौचालये, विहिरी, जनावरांचे गोठे, वृक्षलागवड, फळबाग लागवड, इंदिरा आवास घरकुल योजना वेगाने राबविण्याचा निर्णय घेतला.

ग्रामपंचायतीमध्ये मनरेगाचे आराखडे तयार करताना या कामांवर भर दिला. कामांचे प्रस्ताव असलेल्यांची जॉबकार्ड काढण्यात आली. घरकुल आणि शौचालयांची कामे नरेगातून राबविण्यात येत आहेत. त्याचा फायदा मनरेगाचे लक्ष्य पूर्ण करण्यासाठी झाला. वर्षाअखेरीस ३ लाख ११ हजार ७८८ मनुष्यदिन निर्मिती करण्यात यश आले. त्यावर ८ कोटी ६६ लाख ९२ हजार रुपये खर्च झाले आहेत. 

वर्षभरात जिल्हा परिषदेची १२ हजार २२६ कामे पूर्ण करावयाची होती. त्यातील ९ हजार १९८ कामे पूर्ण झाली असून ३ हजार २८ कामे अपूर्ण आहेत. १७-१८ या आर्थिक वर्षात २ लाख ६३ हजार ७०० मनुष्यदिन निर्मितीचे लक्ष्य निश्‍चित केले आहे. आतापर्यंत ८३ हजार ७७५ मनुष्यदिन निर्मिती झाली असून २ कोटी ९९ लाख खर्च झाले आहेत. ३१ टक्‍के लक्ष्य दोन महिन्यात झाले आहे.

Web Title: ratnagiri konkan news 8 crore expenditure in narega