बड्या कंपन्यांना वरदहस्त; छोटे होणार खिळखिळे

बड्या कंपन्यांना वरदहस्त; छोटे होणार खिळखिळे

पेट्रोलचे दररोजचे बदलते दर - आज दिल्लीत चर्चा  
रत्नागिरी - दररोज बदलणारे पेट्रोलचे दर ही फक्त ग्राहकांनाच नव्हे, तर पेट्रोल पंपचालकांनाही डोकेदुखी ठरली आहे. प्रत्येक वेगळ्या गावागणिक पेट्रोलचे बदलणारे दर ग्राहकांना चक्रावून टाकत आहेत. यामुळे पेट्रोल पंपचालकांना सतत तोटा होत आहे. हा तोटा सहन करण्याची क्षमता ८० टक्के पंपचालकांवर नाही. त्यामुळे ५० टक्के डीलर व्यवसायातून बाद होण्याचा धोका आहे. या पद्धतीने तेल कंपन्या खिळखिळ्या करून बडे उद्योगपती आणि परदेशी तेल कंपन्यांचा फायदा करून देण्याचा हा डाव असल्याची चर्चा सुरू आहे.

पेट्रोल पंपचालकांच्या संघटनेसोबत पेट्रोलियम मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठका सुरू आहेत. बुधवारी (ता. २८) मंत्रालयातील एक्झिक्‍युटिव्ह डायरेक्‍टर (रिटेल) यांच्याशी बैठक होणार आहे. पेट्रोल डीलर्सच्या ३ वेगवेगळ्या फेडरेशन्सना चर्चेसाठी वेगवेगळ्या वेळी बोलावले आहे. सीआयपीडीचे उदयशेठ लोध या चर्चेसाठी रत्नागिरीतून दिल्लीला रवाना झाले. १६ तारखेपासून सुरू झालेल्या या प्रकाराला तोंड कसे द्यायचे, याबाबत पेट्रोल डीलर्समध्ये वेगवेगळी मते आहेत. चर्चा करून तोडगा किंवा संघर्ष अथवा पूर्णपणे शरणागती असे पर्याय आहेत. मोठ्या कंपन्यांचा तोटा छोट्या डीलरवर टाकला जात आहे. देशातील ८० टक्के पेट्रोल पंप हे ‘लो-सेलिंग’ क्षेत्रात आहेत. म्हणजे आठवड्याला ते जेमतेम ४ हजार लिटर पेट्रोल विकतात. आठवड्यातून दोनदा ते पेट्रोल आणणार आणि त्याची विक्री दररोज वेगवेगळ्या भावाने करणार यात ते संपून जाण्याची शक्‍यता अधिक आहे. रिलायन्सने इतरांपेक्षा कमी दराने पेट्रोल विकले तरी चालते; मात्र ही सवलत इतरांना नाही आणि त्यांना ते शक्‍यही नाही. 

बाजारात शेअर वाढावा असे सांगून रिलायन्ससारख्या बड्या अथवा परदेशी कंपन्यांना येथे मुक्तद्वार करून देण्याची पावले टाकली जात आहेत, असे काही डीलर्सचे म्हणणे आहे. अशा बड्या कंपन्यांशी छोटे डीलर स्पर्धा करू शकत नाहीत, हे स्पष्ट आहे. त्यामुळे ते संपण्याचीच शक्‍यता अधिक.

देशभरातील छोटे डीलर आर्थिकदृष्ट्या बड्या कंपन्यांशी स्पर्धा करण्याएवढे सक्षम नाहीत. लो-सेलिंग एरियातील पंप या पद्धतीने व्यवहारात टिकण्याची शक्‍यता नाही. इंटरनॅशनल ट्रेडच्या पातळीवर स्पेक्‍युलेशनवर तालुकास्तरावरील डीलर व्यवसाय करू शकत नाहीत. यातून निर्माण झालेल्या पेचप्रसंगावर तोडगा काढण्यासाठी उद्या चर्चा करीत आहोत. त्यातून मार्ग निघेल.
- उदय लोध, उपाध्यक्ष, सीआयपीडी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com