स्वच्छ ग्रामस्पर्धेत देवघर प्रथम

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 18 जुलै 2017

रत्नागिरी - संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानांतर्गत २०१६-१७ मध्ये घेण्यात आलेल्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धेचे वितरण सोहळा शामराव पेजे सभागृहात झाला. 

खेड तालुक्‍यातील देवघर ग्रामपंचायतीला पाच लाखाचे पारितोषिक देण्यात आले. या कार्यक्रमाचे उद्‌घाटन अध्यक्षा स्नेहा सावंत यांच्या हस्ते झाले. 

यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा, आरोग्य सभापती अरुण कदम, महिला व बालकल्याण सभापती तुजा खांडेकर, समाजकल्याण सभापती चारुता कामतेकर, उदय बने, विलास झगडे, महेश म्हाप, प्रकाश साळवी, आरती तोडणकर, सभापती मेघना पाष्टे, सुनील नावले आदी उपस्थित होते.

तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धा २०१६-१७ मध्ये राबविण्यात आली होती. जिल्हास्तरावर प्रथम क्रमांक मिळवलेल्या देवघर (खेड) ग्रामपंचायतीला ५ लाख, द्वितीय वेरळला (लांजा) तीन लाख, तृतीय कळवंडेला २ लाख व सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आला. या स्पर्धेंतर्गत जिल्हास्तरावर तीन विशेष पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. स्व. आबासाहेब खेडेकर स्मृती पुरस्कार कुंभार्ली (चिपळूण), स्व. वसंतराव नाईक पुरस्कार पालकोट त्रिशूल (गुहागर), बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार जालगाव (दापोली) यांना पप्रत्येकी २५ हजार रुपये देऊन गौरविण्यात आले. ग्रामपंचायतस्तरावरुन कार्यक्रमाला सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक, ग्राम पाणीपुरवठा व स्वच्छता समितीचे अध्यक्ष, सदस्य उपस्थित होते.

Web Title: ratnagiri konkan news devghar first prize in clean village competition