सेरेब्रल पाल्सी रुग्णांसाठी जिल्हा रुग्णालयात स्वतंत्र कक्ष - उदय सामंत

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 30 मे 2017

रत्नागिरी - सेरेब्रल पाल्सीच्या रुग्णांकरिता जिल्हा शासकीय रुग्णालयात स्वतंत्र कक्ष निर्माण करण्यासाठी पाठपुरावा सुरू आहे. प्राथमिक आरोग्य केंद्राच्या काही रुग्णवाहिका सेरेब्रल पाल्सीच्या रुग्णांसाठी वापरण्यात याव्यात, असा ठराव जिल्हा परिषदेच्या माध्यमातून करू. त्याचा उपयोग महाराष्ट्रातील अशा रुग्णांकरिता होईल, असे प्रतिपादन आमदार उदय सामंत यांनी केले.

रत्नागिरी - सेरेब्रल पाल्सीच्या रुग्णांकरिता जिल्हा शासकीय रुग्णालयात स्वतंत्र कक्ष निर्माण करण्यासाठी पाठपुरावा सुरू आहे. प्राथमिक आरोग्य केंद्राच्या काही रुग्णवाहिका सेरेब्रल पाल्सीच्या रुग्णांसाठी वापरण्यात याव्यात, असा ठराव जिल्हा परिषदेच्या माध्यमातून करू. त्याचा उपयोग महाराष्ट्रातील अशा रुग्णांकरिता होईल, असे प्रतिपादन आमदार उदय सामंत यांनी केले.

मुकुल माधव फाऊंडेशन व फिनोलेक्‍स इंडस्ट्रीजच्या वतीने परटवणे येथील फिनोलेक्‍स कॉलनीमध्ये सेरेब्रल पाल्सीच्या रुग्णांच्या पुनर्वसनासाठी भौतिक उपचार केंद्राच्या उद्‌घाटनानंतर ते बोलत होते. ते म्हणाले, कंपनीने हा समाजोपयोगी उपक्रम निरपेक्ष भावनेने सुरू केला असून त्यासाठी आमचे शंभर टक्के सहकार्य राहील. अशा संस्थांना राजाश्रय देऊ. जालना येथे आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या घरी दौरा केला असा त्याचा मुलगाही अपंग असल्याचे दिसले. अशा रुग्णांसाठी मराठवाडा परिसरामध्ये मुकुल माधव फाऊंडेशनने कार्य हाती घ्यावे.

मुकुल माधव फाऊंडेशन व्यवस्थापकीय विश्‍वस्त रितू छाब्रिया यांनी सांगितले की, महाराष्ट्र व गुजरातमध्ये सामाजिक कार्य सुरू आहे. समाजाकडे पाहूनच आम्हाला या कार्यासाठी प्रेरणा मिळत आहे. समाजाने आणखी सहकार्य केल्यास मुलांचे आरोग्य व शिक्षण यात काम करायचे आहे. सेरेब्रल पाल्सीचा उपक्रम सातारा, रत्नागिरी व पुण्यात सुरू आहे.

साताऱ्याप्रमाणे रत्नागिरीमध्ये सेरेब्रल पाल्सीच्या रुग्णांच्या पुनर्वसनाचे काम हाती घेण्याची विनंती जि. प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी केली होती. त्यानुसार फाउंडेशनने शिबिरामध्ये २३७ रुग्णांची तपासणी केली. महिन्याभराच्या काळातच हे केंद्र सुरू झाले. राजापूरच्या साहिल परदळेवर शस्त्रक्रिया झाली असून या आठवड्यात आंबेगावच्या हिरा करोडे हिच्यावर शस्त्रक्रिया होणार आहे, अशी माहिती डॉ. आशुतोष मुळ्ये यांनी दिली. नगराध्यक्ष राहुल पंडित यांनी पालिकेचे सर्व ते 
सहकार्य या प्रकल्पासाठी लाभेल, अशी ग्वाही दिली. 

फिनोलेक्‍सचे व्यवस्थापकीय संचालक एस. एस. मठ यांनी फाउंडेशनचे सेवाकार्य, गोळप येथील मुकुल माधव विद्यालय आदीची माहिती दिली. यावेळी जि. प. चे माजी अध्यक्ष राजाभाऊ लिमये, जि. प. चे उपमुख्य किार्यकारी अधिकारी शेखर सावंत, डॉ. संदीप पटवर्धन, डॉ. सलोनी राजे, वैद्यकीय अधिकारी डॉ. ठोंबरे, अमेरिकेतील सर्जन डॉ. राज लाला आदी उपस्थित होते. सचिन कुलकर्णी यांनी आभार मानले.

Web Title: ratnagiri konkan news district hospital special ward for cerebral palsy patient