उच्च श्रेणीतील पर्यटकांसाठी पहिला रेसकोर्स प्रकल्प

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 22 जानेवारी 2018

रत्नागिरी - मोठ्या शहरातील उच्चभ्रूंमध्ये वेगळी क्रेझ असते ती रेसकोर्सची. या श्रेणीतील पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने निवोशी (ता. गुहागर) येथे रेसकोर्सचा कोकणातील पहिला मोठा प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेतला आहे. प्रकल्पासाठी ३७ हेक्‍टर जागाही निवोशीत घेण्यात आली आहे, अशी माहिती पर्यटन विकास महामंडळाचे प्रादेशिक व्यवस्थापक जगदीश चव्हाण यांनी दिली.

महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या ४३ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून अपर जिल्हाधिकारी बाबासाहेब बेलदार उपस्थित होते. 

श्री. चव्हाण म्हणाले की, ‘‘रेसकोर्ससाठी पहिल्या टप्प्यात ३७ हेक्‍टर जागा घेतली आहे. केंद्रस्तरावर या प्रस्तावावर अंतिम निर्णय होणे बाकी आहे. या प्रकल्पामुळे गुहागर तालुक्‍याच्या पर्यटनामध्ये मोठा बदल होईल. जिल्ह्यात निवास न्याहरी योजनेलाही चांगला प्रतिसाद मिळत आहे. या योजनेत नोंदणी करणाऱ्या व्यावसायिकांची संख्या वाढत आहे. स्थानिकांना रोजगाराची संधी उपलब्ध होत आहे.  कोकणात येणारा पर्यटक हा विदर्भ, मराठवाड्यासह मुंबई, पुण्यास, दिल्ली, केरळ आदी भागातील असतो. नावजलेल्या शहरांमधून आलेल्या पर्यटकांना कोकणातील ग्रामीण जीवनाचे आकर्षण असते. चुलीवरचे जेवण, पंगतीत बसणे, कोकणी पदार्थांचा आदीचा आस्वाद घेताना वेगळा आनंद मिळतो. पर्यटकांचा ओघ वाढू लागला आहे. येथील निसर्गसौंदर्यामुळे परराज्यातील पर्यटकही मोठ्या प्रमाणात येऊ लागले आहेत. मोठ्या किनाऱ्यामुळे कोकणात पर्यटनाचा दोन ते चार वर्षांमध्ये चांगला विकास झाला आहे. विविध सुविधांसह मेरीटाईम बार्डाच्या पुढाकाराने सागरी किनाऱ्याचा कायापालट वर्षभरात करण्यात आला आहे. रत्नागिरी स्कूबा डायव्हिंगसारखे उपक्रमही सुरू झाले आहेत. पर्यटनवाढीचा 
हा एक टप्पा आहे, असेही श्री. चव्हाण म्हणाले.

Web Title: ratnagiri konkan news first racecourse project