‘स्क्विड जिगिंग’ने मच्छीमारीत वाढ - डॉ. आशीष मोहिते

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 18 जुलै 2017

रत्नागिरी - वायलीच्या जाळ्याने मासेमारी करणाऱ्या पारंपरिक व फायबर नौकांनी वायलीचे जाळे पाण्यात सोडल्यावर असलेल्या फावल्या वेळात स्क्विड जिगिंग यंत्राच्या वापराने उत्पन्नात वाढ करता येते. हे यंत्र कमी खर्चाचे असून मत्स्य अभियांत्रिकी विभागाने बनवले आहे, अशी माहिती शिरगाव-रत्नागिरीतील मत्स्य अभियांत्रिकी विभागाचे प्रमुख डॉ. आशीष मोहिते यांनी दिली.

तारामुंबरी सहकारी मच्छी व्यावसायिक संस्थेच्या (देवगड, जि. सिंधुदुर्ग) सुवर्णमहोत्सवानिमित्ताने मासेमारीच्या आधुनिक तंत्रज्ञानावर एक दिवसाचे प्रशिक्षण पार पडले. त्याप्रसंगी त्यांनी मार्गदर्शन केले. या यंत्राच्या वापरासह ट्रॉल जाळ्याचा नेहमीचा खोला बदलून बी.आर.डी. जाळे वापरून शाश्‍वत मासेमारी तसेच मासेमारीच्या आधुनिक पद्धतीमध्ये पोल अँड लाईनद्वारे खोल समुद्रातील गेदर माशाची मासेमारी करून नेहमीच्या उत्पादनात वाढ होऊ शकते, याबाबतही मागदर्शन केले.

प्रा. मकरंद शारंगधर यांनी मासेमारीला खोल समुद्रात जाताना आवश्‍यक जीवरक्षक साधने तसेच नौका आपत्तीत असताना वापरावयाची आपत्तीदर्शके त्यांचे महत्त्व तसेच त्यांचा वापर याविषयी सविस्तर माहिती दिली. डॉ. राहुल सदावर्ते यांनी मासेमारीसाठी आवश्‍यक असलेल्या  मत्स्यशोधक यंत्रांचा व दळणवळणाची साधने याबाबत मार्गदर्शन केले. डॉ. विजय मुळ्ये यांनी नौकानयनशास्त्र व नौकानयनाच्या आधुनिक उपकरणांचा वापर करून संभाव्य मत्स्यसाठ्यांच्या ठिकाणी नेमके पोहचण्यासाठी कसा उपयोग करता येईल याविषयी मार्गदर्शन केले. संस्थेचे तज्ज्ञ संस्थापक मुरलीधर जोशी अध्यक्ष होते. प्रशिक्षणात दिलेल्या शास्त्रीय माहितीचा वापर करून मच्छीमारांनी परंपरागत मासेमारीत प्रगती करावी, असे आवाहन त्यांनी करण्यात आले.

आधुनिक आयुधांचे प्रदर्शन
या कार्यक्रमादरम्यान मत्स्य अभियांत्रिकी विभागाने नौका व मासे पकडण्याची विविध आधुनिक आयुधे, नौकानयन व दळणवळणाची साधने, जीवरक्षक साधने, ट्रॉल जाळ्याकरता बी.आर.डी. आधुनिक खोला, मासेमारीच्या आधुनिक पद्धती या विषयांवर आधारित प्रदर्शन तारामुंबरी सहकारी संस्थेत मांडण्यात आले होते.

Web Title: ratnagiri konkan news fishing increase by squid jigging