जळीत रुग्णांची परवड थांबणार

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 17 जुलै 2017

सिव्हिलमध्ये नूतनीकरणासाठी २३ लाख - रक्‍तपेढीही होणार सुरक्षित

रत्नागिरी - जिल्हा शासकीय रुग्णालयातील जळीत कक्षाच्या (बर्न वॉर्ड) नूतनीकरणासाठी शासनाने २३ लाख २२ हजार आणि रक्तपेढीतील छताच्या दुरुस्तीसाठी ११ लाख ८९ हजारांचा निधी आरोग्य विभागाने मंजूर केला आहे. या वॉर्डमधील सोयी-सुविधांअभावी जळीत रुग्णांना सांगली, मिरजला पाठवावे लागत होते; मात्र या वॉर्डचे नूतनीकरण केल्यामुळे रुग्णांवर उपचार करणे शक्‍य होणार आहे.

आत्महत्या किंवा दुर्घटनेमध्ये भाजलेल्या रुग्णांवर उपचार करण्याची सुविधा जिल्ह्यात कोठेही उपलब्ध नाही. त्यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले जाते; परंतु तेथील मच्छरदाणीमध्ये ठेवण्यापलीकडे अधिकचे उपचार केले जात नाहीत. हा वॉर्ड पूर्णतः वातानुकूलित असावा लागतो. आवश्‍यक सुविधा नसल्याने रुग्णाचा संसर्गामुळे भाजलेल्या अनेक रुग्णांचा मृत्यू होतो. काही रुग्णांना सांगली, मिरज येथे अधिक उपचारासाठी पाठवावे लागते. ही गैरसोय लक्षात घेऊन सिव्हिल प्रशासनाकडून शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यात आला होता.
सुसज्ज बर्न वॉर्ड तयार करण्यासाठी २३ लाख २२ हजार १८५ रुपये मंजूर करण्यात आले आहेत. रक्तपेढीच्या छत दुरुस्तीलाही निधी मिळाला आहे.

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या परवानगीनंतर दोन्ही कामांच्या निविदा एकत्रित काढण्याच्या सूचना शासनाने दिल्या आहेत. रक्तपेढीत करोडो रुपयांची अत्याधुनिक यंत्रणा बसविण्यात आली आहे. ब्लड सेप्रेशन युनिट आहे; परंतु इमारतीच्या छताला गळती लागल्याने अत्याधुनिक यंत्रणा खराब होण्याची दाट शक्‍यता आहे. छताच्या दुरुस्तीचा प्रस्ताव सार्वजनिक बांधकाम विभागाने राज्य सरकारकडे पाठविला होता. त्याला दोन वर्षानंतर मंजुरी मिळाली. जिल्हा रुग्णालयातील ३५ लाखांच्या कामांना पावसाळ्यानंतर सुरवात होईल.

Web Title: ratnagiri konkan news government hospital for burn patient