कचरा गाड्यांवर जीपीएस यंत्रणा

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 26 जून 2017

रत्नागिरी - येथील पालिकेच्या कचरा वाहतूक करणाऱ्या गाड्यांचे (डंपर) नेमके लोकेशन (ठिकाण) आता पालिकेला मिळणार आहे. प्रत्येक प्रभागातील कचऱ्याची वेळेवर उचल आणि वाहतूक व्हावी, यासाठी या गाड्यांवर ‘जीपीएस’ यंत्रणा बसविण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने पालिकेने पावले टाकली असल्याचे काही सदस्यांनी सांगितले. शहराच्या सुंदरतेला गालबोट लावणाऱ्या काही कचरा टाकण्याच्या ठिकाणांवर सीसीटीव्हीच्या वॉचचा उतारा दिल्यानंतर कचरा उचलणाऱ्या गाड्यांवर जीपीएस यंत्रणा बसविण्यात येणार आहे.

त्यासाठी पालिका त्याच्यावर दरवर्षी लाखो रुपये खर्च करते. पालिकेच्या आरोग्य विभागाकडून कचरामुक्त शहर करण्यासाठी कठोर पावले उचलली जात आहेत. त्याचाच हा एक भाग  आहे. यापूर्वी काही भागात कचरा कुंडीमुक्त शहर करण्याच्या दृष्टीने सुरुवात झाली. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. कचरा गोळा करण्यासाठी आता अनेक प्रभागात पालिकेच्या गाड्या फिरत आहेत; परंतु शहरामध्ये अनेक ठिकाणच्या मोक्याच्या आणि मोठी वर्दळ असणाऱ्या ठिकाणांचा नागरिकांनी कचराकुंडी म्हणून वापर केला आहे. त्यामुळे शहराच्या सुंदरतेला गालबोट लागत आहे. पालिकेने तेथे फलक, झाडे लावूनही काही परिणाम झालेला नाही. त्यामुळे अनेक ठिकाणी सीसीटीव्ही बसविण्यात आले. त्याचा सकारात्मक परिणाम झाला असून या जागा स्वच्छ दिसत आहेत. 

काही प्रभागात अजूनही कचराकुंड्या आहेत. तेथील कचरा उचलण्यामध्ये अनियमितता असल्याच्या तक्रारी आहेत. पालिकेच्या १४ गाड्या कुठे जातात, चालक, कर्मचारी वेळकाढूपणा करतात का, यावर लक्ष ठेवण्यासाठी गाड्यांवर जीपीएस यंत्रणा बसविण्याचा प्रस्ताव पुढे आला आहे. नगराध्यक्ष, मुख्याधिकाऱ्यांना सर्व गाड्यांचे लोकेशन मॅपद्वारे पालिकेत बसून पाहू शकतात. त्यामुळे चालक, कर्मचाऱ्यांवर वचक राहणार आहे. 

Web Title: ratnagiri konkan news gps system on garbage vehicle