मुख्याध्यापकांचे वेतन ऑफलाइन - विनोद तावडे

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 16 जुलै 2017

रत्नागिरी - मे महिन्यापासून वेतन न मिळाल्याने हतबल झालेल्या प्राथमिक शाळांच्या मुख्याध्यापकांनी आज कुटुंबांसह जिल्हा परिषदेपुढे उपोषण सुरू केले. याकडे प्रशासकीय अधिकाऱ्यांनी पाठ फिरवली; मात्र माजी उपाध्यक्ष व भाजप तालुकाध्यक्ष सतीश शेवडेंनी शिक्षणमंत्री विनोद तावडेंशी दूरध्वनीवरून संपर्क साधला. मुख्याध्यापकांचे पगार ऑफलाइन करण्यासाठी दोन दिवसांत शिक्षणाधिकाऱ्यांना आदेश देण्याचे आश्‍वासन याप्रसंगी श्री. तावडे यांनी दिले. त्यामुळे मुख्याध्यापकांनी उपोषण तात्पुरते स्थगित करण्यात आले.

याप्रसंगी श्री. शेवडे यांनी जिल्हाध्यक्ष बाळ माने यांच्याबरोबर दूरध्वनीवरून मुख्याध्यापकांशी चर्चा घडवून आणली. त्यानंतर शिक्षणमंत्री तावडे यांच्याशी मुख्याध्यापकांनी चर्चा केली. तीन महिन्यांचा पगार ऑफलाईन करावा, अशा सूचना येत्या दोन दिवसांत शिक्षणाधिकाऱ्यांना देऊ असे आश्‍वासन याप्रसंगी श्री. तावडे यांनी दिले. मुख्याध्यापक हे पदनाम तसेच ठेवण्यात येईल; मात्र त्यांना उपशिक्षकाप्रमाणे तासिका घ्याव्या लागतील. उर्वरित प्रलंबित मागण्यासाठी मुख्याध्यापक शिष्टमंडळ, शिक्षणाधिकारी यांची एकत्रित बैठक घेऊ असे श्री. तावडे यांनी सांगितले. त्याला संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.

रत्नागिरी जिल्हा परिषदेकडील अतिरिक्‍त मुख्याध्यापकांचे मे २०१७ पासूनचे वेतन तत्काळ अदा करावे व यापुढे वेतन नियमित करावे. शालेय शिक्षण विभागाच्या आदेशान्वये सरल प्रणालीत रत्नागिरी जिल्ह्यातील अतिरिक्‍त मुख्याध्यापकांच्या समोर पदनाम मुख्याध्यापक म्हणून दर्शविण्यात यावे. तसेच संचमान्यतेची दुरुस्ती करून रत्नागिरी जिल्हा परिषदेकडील मुख्याध्यापकांचे शालार्थ प्रणालीत ऑनलाईन पगार काढण्यात यावेत, या मागण्यासाठी ग्रेड मुख्याध्यापक महासंघाच्या रत्नागिरी जिल्हा शाखेतर्फे जिल्हा परिषदेपुढे उपोषण केले. जिल्ह्यातील ४५७ मुख्याध्यापकांनी आपल्या कुटुंबासह जिल्हा परिषदेपुढे हजेरी लावली.
रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्हा परिषद शाळेतील अतिरिक्‍त मुख्याध्याकांचे पदनाम तसेच ठेवून त्यांना त्याच शाळेत ठेवण्यात यावे, ही मागणी मान्य केलेली नाही. निकषांप्रमाणे संचमान्यता करून शाळेत पटसंख्येअभावी मुख्याध्यापकांचे पद अतिरिक्‍त ठरत असल्यास मुख्याध्यापकांना अतिरिक्‍त न ठरविता इतर शिक्षकांना अतिरिक्‍त ठरवावे, असे शासनाचे आदेश होते; परंतु जिल्ह्यात त्याची अंमलबजावणी झालेली नाही. त्यामुळे मुख्याध्यापकांची गैरसोय झाली आहे. त्यासाठी उपोषण करणाऱ्यांची भेट भाजपचे तालुकाध्यक्ष सतीश शेवडे, उमेश कुलकर्णी, अनिकेत पटवर्धन, प्रा. नाना शिंदे यांनी घेतली.

मुख्याध्यापकांनी माझ्याशी संपर्क साधला. त्यानंतर मी दूरध्वनीवरून शिक्षणमंत्र्यांशी संवाद साधला. त्यांचे प्रश्‍न सोडविले जातील असे तावडे यांनी सांगितले.
- सतीश शेवडे, तालुकाध्यक्ष, भाजप

Web Title: ratnagiri konkan news headmaster salary offline