कातळशिल्प होणार आंतरराष्ट्रीय पर्यटनस्थळ!

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 19 जानेवारी 2018

रत्नागिरी - रत्नागिरी, राजापूर, लांजा तालुक्‍यांमध्ये आढळलेली कातळशिल्पे आंतरराष्ट्रीय पर्यटनस्थळे होण्याच्या मार्गावर आहेत. कोकणचा इतिहास उलगडणाऱ्या या खोदशिल्पांना राज्य संरक्षित करण्याचा प्रयत्न सुरू आहे, असे महाराष्ट्र राज्य पुरातत्त्व वस्तुसंग्रहालय खात्याचे संचालक तेजस गर्गे यांनी सांगितले. विविध ठिकाणची कातळशिल्पे पाहिल्यानंतर ते बोलत होते.

त्यांनी मंगळवारी दिवसभर चवे, देवूड, उक्षी, बारसू, निवळी, गावडेवाडी, गावखडी, कशेळी आदी ठिकाणच्या कातळशिल्पांना भेट दिली. उक्षी येथे सरपंच मिलिंद खानविलकर यांनी लोकसहभागातून कातळ खोदशिल्पांचे संरक्षण केले आहे. ग्रामस्थांच्या एकीमुळे हे शक्‍य झाले आहे. याबद्दल गर्गे यांनी खानविलकर व ग्रामस्थांचे कौतुक केले. त्यांच्यासमवेत रत्नागिरी विभागाचे उपसंचालक भा. वि. कुलकर्णी, कातळ खोदशिल्प समन्वयक ऋत्वीज आपटे, कातळ खोदशिल्प मोहिमेचे प्रमुख सुधीर रिसबूड, धनंजय मराठे आदी उपस्थित होते.

गेल्या तीन वर्षांत ४५ गावांत सुमारे ७०० कातळशिल्पे शोधण्यात आली. त्यांचा काळ कोणता ते ठरविण्यात येत आहे. कोकणचा हा ठेवा जपण्यासाठी निसर्गप्रेमी योगदान देत आहेत. त्यांना ग्रामस्थ व शासनाचे सहकार्य मिळत आहे. यामुळे येत्या काही महिन्यांत या पुरातन ठेव्याला आंतरराष्ट्रीय दर्जा मिळेल या दिशेने पावले उचलली जात आहेत. गर्गे यांच्या भेटीने याला बळ मिळाले आहे.

Web Title: ratnagiri konkan news international tourism place katalshilp