‘जलयुक्त’ची एसीबीमार्फत चौकशी - रामदास कदम

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 30 मे 2017

रत्नागिरी - जलयुक्त शिवारअंतर्गत दापोली तालुक्‍यातील वणौशी व पंचनदी या ठिकाणी झालेल्या कामांची एसीबीमार्फत सखोल चौकशी करण्यात येणार आहे, अशी माहिती पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी दिली. फरारे, ओणणवसे, देवाचा डोंगर, वाघिवणे, कर्दे, लाडघर येथील कामांचीही चौकशी होणार असल्याचे त्यांनी पत्रकारांना सांगितले. 

कदम म्हणाले की, याबाबत अधिकाऱ्यांसह चार कर्मचाऱ्यांच्या निलंबनाची शिफारस ही सुरुवात आहे. अजूनही अनेकजण यात अडकलेले आहेत. मोठा मासा तर बाहेरच आहे. अधिकाऱ्यांच्या चौकशीत दापोली, खेड व मंडणगड तालुक्‍यात जलयुक्त शिवार योजनेमध्ये मोठा गैरव्यवहार झाल्याच्या आरोपांवर शिक्कामोर्तंबच झाले. महसूल अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली नेमलेल्या चौकशी समितीने जिल्हाधिकाऱ्यांना सादर केलेल्या अहवालात गैरव्यवहाराचा ठपका ठेवला आहे. खेड तालुका कृषी अधिकाऱ्यांसह चौघांना निलंबित करण्याची शिफारस वरिष्ठांकडे केल्याची माहिती पालकमंत्री रवींद्र वायकर दिली. त्यावर रामदास कदम यांनी वरीलप्रमाणे मल्लीनाथी केली.

चौकशी समितीने खेड तालुक्‍यातील निळवणे आणि दापोली तालुक्‍यातील वणौशी तर्फे पंचनदी या ठिकाणी जलसंधारण कामाची तपासणी करून ठपका ठेवला आहे. दापोलीच्या कामांची तांत्रिक अधिकाऱ्यांकडून सखोल चौकशी करण्याचे काम अद्याप बाकी आहे. ते स्वतंत्रपणे करण्यात येणार आहे. मात्र रामदास कदम यांनी ही चौकशी एसीबीमार्फत होणार असल्याचे सांगितले. 

मजूर संस्थांना काळ्या यादीत टाका
जलयुक्त शिवारमधील सिमेंट नाला बांध, वळण बंधारे, माती नाला बांध, समतल चर ही कामे दर्जाहीन झाली आहेत. ही कामे ज्या ठेकेदारांनी तसेच ज्या मजूर संस्थांनी केली, त्यांना काळ्या यादीत टाकण्याची मागणी करणार असल्याचेही रामदास कदम यांनी सांगितले.

Web Title: ratnagiri konkan news jalyukt shivar inquiry by abc