कौटुंबिक हिंसाचारात हरवते महिलांचे मानसिक स्वास्थ्य

शिरीष दामले
शुक्रवार, 19 जानेवारी 2018

रत्नागिरी - महिला सबलीकरणासाठी महिलांनीच केलेल्या प्रयत्नांतून एकेक शिखरे पार केली असली, तरी असे कर्तृत्व हे बरेचवेळा वैयक्तिक पातळीवर असते. महिलांना मिळणारी भेदाची वागणूक भारत आणि त्यातही महाराष्ट्रात सातत्याने जाणवत राहते. कौटुंबिक हिंसाचार हा त्याचाच एक भाग असतो. महिलांवरील कौटुंबिक हिंसाचार आणि त्यांचे मानसिक स्वास्थ्य यांचा परस्पर संबंध शास्त्रानेही सिद्ध झाला आहे. कौटुंबिक हिंसाचार जेवढा अधिक तेवढे गृहिणीचे अथवा तरुणीचे मानसिक स्वास्थ्य कमी आढळते.

रत्नागिरी - महिला सबलीकरणासाठी महिलांनीच केलेल्या प्रयत्नांतून एकेक शिखरे पार केली असली, तरी असे कर्तृत्व हे बरेचवेळा वैयक्तिक पातळीवर असते. महिलांना मिळणारी भेदाची वागणूक भारत आणि त्यातही महाराष्ट्रात सातत्याने जाणवत राहते. कौटुंबिक हिंसाचार हा त्याचाच एक भाग असतो. महिलांवरील कौटुंबिक हिंसाचार आणि त्यांचे मानसिक स्वास्थ्य यांचा परस्पर संबंध शास्त्रानेही सिद्ध झाला आहे. कौटुंबिक हिंसाचार जेवढा अधिक तेवढे गृहिणीचे अथवा तरुणीचे मानसिक स्वास्थ्य कमी आढळते.

येथील गोगटे महाविद्यालयातील मानसशास्त्राच्या प्रा. बीना कळंबटे यांनी पुणे येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय आंतरशाखीय परिषदेमध्ये शोधनिबंध सादर केला. त्यामध्ये अभ्यासाअंती वरील निष्कर्ष काढला आहे. 

प्रसिद्ध झालेल्या निवडक शोधनिबंधांमध्ये त्याचा समावेश आहे. संशोधनासाठी रत्नागिरी व कोल्हापूर जिल्ह्यातील २२ ते २६ वयोगटाच्या, विवाहाला किमान तीन वर्षे झालेल्या गृहिणी निवडण्यात आल्या. त्यांचे शिक्षण किमान बारावी होते. प्रश्‍नावलीतर्फे त्यांच्याशी संवाद साधण्यात आला. अनेकांनी प्रत्येक संवादात कौटुंबिक हिंसाचार झाल्याचे मान्य केले. गप्पा मारताना होय सांगितले, पण कागदावर लिहिताना मात्र नकार दिला. अशांना वगळून अंतिमतः सुमारे ४०० महिलांचा डाटा जमा करण्यात आला. कौटुंबिक हिंसाचाराची संकल्पना आणि आपल्यावर अशातऱ्हेचा हिंसाचार होतो आहे, हेही अनेकांच्या गावी नव्हते. 

महिलांबाबतच्या कौटुंबिक हिंसाचाराचा मानसिक स्वास्थ्याशी संबंध काय, हे शोधताना अशा हिंसाचारामुळे त्यांच्या मानसिक तसेच शारीरिक स्वास्थ्यावर विपरित परिणाम होतो. त्यातही कौटुंबिक हिंसाचाराचा मानसिक स्वास्थ्याशी उच्च संबंध आढळून आला. प्रा. कळंबटे यांनी केलेल्या संशोधनामध्ये ७२ टक्के विवाहितांवर कौटुंबिक हिंसाचार होत असल्याचे निष्पन्न झाले. त्यापैकी १४.५८ टक्के विवाहितांवर नेहमीच कौटुंबिक हिंसाचार होतो, असे आकडेवारीच सांगते. यापैकी ६.२५ टक्के विवाहितांना सायकोडायग्नोस्टिक हेल्पची गरज असते. प्रत्यक्षात ती अपवादानेच मिळते, असे लक्षात आले. या नमुना गटामध्ये ६८.७४ टक्के गृहिणींवर शाब्दिक व भावनिक हिंसाचार होतो, असे आढळून आले. सुमारे ४० टक्के विवाहितांवर अनेकदा, तर १८.७५ टक्के विवाहितांवर अपवादानेच कौटुंबिक हिंसाचार होतो.

कौटुंबिक हिंसा म्हणजे काय?
कौटुंबिक हिंसा ही सामाजिक समस्याही आहे. कुटुंबातील एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीला मिळणारी वाईट वागणूक आणि होणारा मानसिक, शारीरिक किंवा लैंगिक छळ, आर्थिक, शाब्दिक किंवा कोणत्याही पद्धतीने होणारी मानहानी म्हणजे कौटुंबिक हिंसा आहे. ही महिला आणि मुलींबाबत अधिक असते.

कोणत्याही हिंसाचाराला बळी पडणाऱ्या मुली, महिलांना गरज असते ती भावनिक, मानसिक आधाराची. मात्र त्यांच्याकडे संशयाने पाहिले जाते. त्यामुळे महिलांबाबतचे समाजमन बदलले तर सर्व क्षेत्रांत त्यांचे सबलीकरण शक्‍य होईल.
- प्रा. बीना कळंबटे, रत्नागिरी

Web Title: ratnagiri konkan news Mental Health of Women Who Lies in Family Violence