‘दामले’मध्‍ये साकारली ‘मॉडेल बालवाडी’

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 21 जून 2017

रत्नागिरी - खासगी शाळांच्या स्पर्धेत आता पालिकाही उतरली आहे. महिला व बाल कल्याण समिती सभापती शिल्पा सुर्वे यांच्या कल्पनेतून दामले विद्यालयात आकर्षक बालवाडी साकारली आहे. या ‘मॉडेल बालवाडी’चा आरंभ बुधवारी (ता. २१ ) खासदार विनायक राऊत आणि आमदार उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. ४० मुलांना यामध्ये प्रवेश देण्यात आला आहे. 
येथील पालिकेच्या २१ शाळांमधील विद्यार्थ्यांच्या गळतीचे प्रमाण अधिक आहे.

शिक्षण सभापती तथा उपनगराध्यक्ष राजेश सावंत यांनी दुर्लक्षित राहिलेल्या या विभागाकडे लक्ष देण्यास सुुरुवात केली आहे. पटसंख्या वाढावी, यासाठी अनेक प्रयत्न सुरू आहेत. १०, १२ नंतर पुढे काय करायचे, यावर अविनाश धर्माधिकारी यांचे मार्गदर्शन हा त्याचाच एक भाग होता. पालिकेच्या बालवाड्यांमध्ये प्रवेश घेणाऱ्या मुलांची संख्या घटत आहे. ती वाढली तर पुढील वर्गांची पटसंख्या वाढेल. सौ. सुर्वे यांनी पुढाकार घेतला आहे. 

या विद्यालयात प्रयोग करून त्यांनी मॉडेल बालवाडी बनविली. येथील वर्गखोली रंगरंगोटी करून मुलं त्या वातावरणात रमतील यादृष्टीने आकरही दिला आहे. शिवसेनेच्या सत्ताधाऱ्यांनी शैक्षणिक क्षेत्रामध्ये प्रभावी कामाला सुरवात केली आहे.

Web Title: ratnagiri konkan news model balwadi