तारलीसाठी संघटनांचा पुढाकार

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 13 ऑगस्ट 2017

रत्नागिरी - अनिर्बंध, अनियंत्रित, बेकायदेशीर मासेमारीमुळे मागील काही वर्षांत तारलीच्या साठ्यात घट झाली आहे. यामुळे गोवा व रत्नागिरीतील मच्छीमारी संघटना व खासगी क्षेत्रातील कंपन्यांनी एकत्रितपणे मत्स्यव्यवसाय सुधारणा प्रकल्पाची (एफआयपी) स्थापना केली आहे.

शाश्‍वत मत्स्य व्यवसायासाठी शासन व खासगी मत्स्य उद्योजकांनी हे पाऊल उचलले आहे. या अनुषंगाने सहा प्रमुख मत्स्यपालन संस्था, फिशमिल उत्पादक व जलखाद्य उत्पादकांनी सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या 
केल्या.

गोवा किनारपट्टीवरील जिल्हे व रत्नागिरी जिल्ह्यातील मत्स्यव्यवसाय व संबंधित उत्पादकांना याचा फायदा होणार आहे. रत्नदुर्ग मच्छीमार सहकारी संस्था, मिरकरवाडा आदर्श मच्छीमार सहकारी संस्था या रत्नागिरीतल्या संस्था तसेच फिशरीज कॉलेज यामध्ये सहभागी झाले आहे. एफआयपी प्रकल्पाचे उद्‌घाटन भारतातील पश्‍चिम किनाऱ्यावरील इंडियन ऑईल सार्डेनवर गोवा व रत्नागिरी जिल्ह्यातील किनारपट्टीपर्यंत मर्यादित आहे.

मत्स्यव्यवसाय व्यवस्थापनाची कार्यक्षमता सुधारणे, अन्नसुरक्षा, पर्यावरणीय जबाबदारी वाढवणे, पुरवठा साखळीमध्ये मत्स्य उत्पादनांचे पारदर्शी ट्रेसबॅबिलिटेशन करणे, आंतरराष्ट्रीय दर्जाच्या मानकांशी जुळण्यासाठी मत्स्य उत्पादनांच्या पुरवठा साखळीत स्थिरता वाढवणे असे या सामंजस्य कराराचे हेतू आहेत.

इंटरनॅशनल फिशमिल अँड फिश ऑईल ऑर्गनायझेशनकडून (युके) या प्रकल्पाला मार्गदर्शन केले जाणार आहे.

रत्नदुर्ग सोसायटीचे अध्यक्ष संदेश सुर्वे यांनी सांगितले की, मत्स्यपालनाची उत्पादनाचे मत्स्यपालनाच्या स्रोतांकडूनच येतात. संपूर्ण पुरवठा साखळीमध्ये सापडतील. पुरवठा साखळी पारदर्शक असणे आवश्‍यक आहे. संबंधित माहिती आंतरराष्ट्रीय खरेदीदार व भागधारकांना स्पष्टपणे कळवली जातील. मत्स्यव्यवसायाचे प्रभावी व्यवस्थापन, मत्स्यपालन व ओव्हरफिशिंग, विस्तीर्ण सागरी पर्यावरणातील संरक्षणास प्रतिबंध करण्यात येईल. मत्स्यप्रक्रिया कारखान्यात येणाऱ्या मासळीच्या स्रोताची नोंद बंधनकारक आहे. त्यामुळे अनियंत्रित अवैध मासेमारीला आळा बसेल.
आदर्श मच्छीमार सोसायटीचे अध्यक्ष इम्रान मुकादम यांनी सांगितले की, आंतरराष्ट्रीय स्तरावरील मानकांवर आधारित हा भारतातील पहिलाच प्रकल्प असावा. याचा फायदा रत्नागिरी व गोव्यातील सोसायटी, संस्थांना होणार आहे. तसेच ओमेगा फिशमिलचे संचालक अमोल पाटील म्हणाले की, मत्स्यव्यवसाय जास्त काळ टिकला पाहिजे व भागीदारांना स्रोत संवर्धनासाठी व कच्च्या मालाची मत्स्यसंवर्धनाची स्थिर उपलब्धता निश्‍चित करण्यासाठी हे एक व्यासपीठ आहे. देशातल्या अत्याधुनिक आंतरराष्ट्रीय आवश्‍यकता पूर्ण करून उच्च दर्जाच्या फिशमिलची मागणी वाढेल.

Web Title: ratnagiri konkan news organization initiatives for tarali