उच्चाधिकार समितीचा प्रस्ताव अमान्य

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 18 जानेवारी 2018

रत्नागिरी - एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांनी वेतनवाढीसाठी केलेल्या आंदोलनानंतर उच्चाधिकार समितीची स्थापना झाली; मात्र त्या समितीने ५.५ टक्के तुटपुंजी वाढ केली. हा प्रस्ताव महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेने फेटाळला आहे. १९ जानेवारीला कृती समितीची तातडीची बैठक होणार असून त्यात पुढील निर्णय घेण्यात येईल. मागण्या मान्य करा नाहीतर धक्का देऊ, अशी भूमिका घेतल्याचे महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे व जनरल सेक्रेटरी हनुमंत ताटे यांनी सांगितले.

एसटी कामगारांनी अपुरे पगार व वेतन करारासाठी न भूतो न भविष्यती संप पुकारला. राज्य शासनाने वाटाण्याच्या अक्षता लावल्या. त्यानंतर उच्च न्यायालयाने हस्तक्षेप केला. उच्च न्यायालयाचा आदर राखून संप मागे घेण्यात आला. न्यायालयाने वेतनवाढीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापना केली. या समितीकडून महाराष्ट्रातील लाखो कामगारांच्या अपेक्षा होत्या. पण आज कामगारांच्या नशिबी निराशाच आली.

उच्चाधिकार समितीने दिलेल्या एकतर्फी अहवालात मूळ वेतनात केवळ ५.५ टक्के वाढ दर्शविण्यात आली आहे. म्हणजेच ४७०० रुपये बेसिक असणाऱ्या कामगाराला सध्या एकूण पगार ११,०४५ रुपये मिळत होता. त्याला नवीन सूत्राप्रमाणे ११,९१९ रुपये पगार मिळेल. म्हणजेच  केवळ ८७४ रुपयांची वाढ सुचवण्यात आली आहे. ही कामगारांची थट्टा आहे. त्यामुळे कामगारांमध्ये अत्यंत असंतोष पसरला आहे. मान्यताप्राप्त कामगार संघटनेच्या आजच्या राज्य कार्यकारिणीने हा एकतर्फी प्रस्ताव फेटाळला. आता १९ जानेवारीला बैठकीत पुढील निर्णय घेण्यात येईल, असे शिंदे यांनी सांगितले.

Web Title: ratnagiri konkan news The proposal of the Empowered Committee is invalid