तीन दुकानांवर चोरट्यांचा डल्ला

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 18 जून 2017

रत्नागिरी - भर पावसात कुवारबाव येथील तीन दुकाने फोडून चोरट्यांनी पोलिसांपुढे आव्हान निर्माण केले आहे. छपरांचे पत्रे काढून चोरट्यांनी दुकानात डल्ला मारल्याचे पुढे आले आहे. यामध्ये हजारोंचा ऐवज लंपास केल्याचे समजते; मात्र दुकानमालकांनी तक्रार दाखल केली नसल्याचे शहर पोलिस ठाण्यातून सांगण्यात आले.

रेल्वे स्थानकापासून काही अंतरावर असलेल्या कुवारबाव बाजारपेठेत चोरट्यांनी काल (ता. १६) मध्यरात्री धुमाकूळ घातला. तीन दुकाने फोडून चोरट्यांनी सुमारे हजारोंचा ऐवज लंपास केला. कुवारबाव येथील एक गॅरेज, स्टुडिओ आणि टायरच्या दुकानात चोरी केल्याची माहिती पुढे आली आहे. 

मध्यरात्री संततधार सुरू असतानाही चोरट्यांनी केलेल्या चोऱ्यांमुळे पोलिसही हादरले आहेत. या तिन्ही दुकानांची छपरे पत्र्याची आहेत. पत्रे उचकटून चोरट्यांनी आतमध्ये प्रवेश केला. तिजोरीतील रकमेसह काही साहित्यही चोरट्यांनी लंपास केले. हजारोंचा ऐवज चोरीला गेल्याची चर्चा कुवारबाव परिसरात सुरू आहे; परंतु याची तक्रार न दिल्यामुळे पोलिस तपासात अडथळे आले आहे. हा प्रकार भुरट्या चोऱ्यांकडून झाला आहे की, शहरात डल्ला मारलेल्या चड्डी बनियन गॅंगने याबाबत संभ्रमाचे वातावरण आहे.

गेले दोन आठवड्यात शहरामध्ये चोरट्यांनी धुमाकूळ घातला होता. खालची आळी, मिरकरवाडा परिसरासह कुवारबाव येथील दुकानात चोरी झाल्याने तपासाची कक्षा वाढवावी लागणार आहे. मिरकरवाडा येथे चोरी करणाऱ्या चोरट्यांच्या पोलिसांनी मुसक्‍या आवळल्या आहेत; परंतु खालची आणि शिवाजीनगर येथील चोरट्यांचा माग काढणे अजूनही शक्‍य झालेले नाही. ती गॅंग जोपर्यंत ताब्यात येत नाही, तोपर्यंत चोऱ्यांचे सत्र सुरूच राहण्याची भीती वर्तविली जात आहे. शहर परिसरात हंगाम घालणाऱ्या चोरट्यांना लगाम घालण्यासाठी पोलिसांनी रात्र गस्ती वाढविली आहे. आता कुवारबाव परिसरातही लक्ष्य केंद्रित करावे लागणार आहे. रेल्वे स्थानक परिसरात सीसीटीव्ही असल्यामुळे त्याचा फायदा पोलिसांच्या तपासात झाला असता; पण तक्रारच नसल्याने त्याचा छडा लागणे अशक्‍य आहे.

Web Title: ratnagiri konkan news theft in ratnagiri