रत्नागिरीः कुवारबाव येथे सर्वपक्षीय गाव पॅनलकडून शिवसेनेचा धुव्वा

रत्नागिरीः कुवारबाव येथे सर्वपक्षीय गाव पॅनलकडून शिवसेनेचा धुव्वा

रत्नागिरी- लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर प्रतिष्ठेच्या ठरलेल्या कुवारबाव ग्रामपंचायत निवडणुकीत शिवसेनेचा धुव्वा उडवत सर्वपक्षीय गाव विकास पॅनलने 15 पैकी 8 जागा मिळवत दणदणीत विजय मिळवला. सरपंचपदाच्या निवडणुकीत नवख्या गावविकास आघाडीच्या मंजिरी पाडाळकर यांचा 98 मतांनी विजय झाला.

येथील तहसील कार्यालयात ही मतमोजणी पार पडली. रत्नागिरी तालुक्यातील कुवारबाव, लाजुळ आणि पोमिंड खुर्द या तीन ग्रामपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक लागली. रविवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यापूर्वी लाजुळ ग्रामपंचायतीच्या सदस्य पदाची निवडणूक बिनविरोध झाली होती. सरपंच पदाकरिता मतदान घेण्यात आले. पोमेंदी खुर्दमध्ये 5 जागा बिनविरोध झाल्या.

कुवरबावला मात्र अटीतटीची लढत होती. शिवसेनेविरुद्ध भाजप, राष्ट्रवादी, कॉंग्रेस, मनसे, स्वाभिमान आदींनी गाव विकास पॅनेलची मोट बांधली होती. शिवसेनेसाठी ही ग्रामपंचायत अस्तित्वाची लढाई होती. शिवसेनेने खासदार, आमदार यांच्यासह सर्व पदाधिकारी प्रचारात उतरवले होते. गावविकासकडून स्वाभिमानचे माजी खासदार निलेश राणे, भाजप जिल्हाध्यक्ष बाळ माने, राष्ट्रवादीकडून सुदेश मयेकर, उमेश शेट्ये, बबलू कोटवडेकर, मनसेचे महेंद्र नागवेकर आदी सहभागी झाले होते.

निकालात 15 जागांपैकी 8 जागा गावविकासला तर शिवसेनेला 7 जागांवर समाधान मानावे लागले. शिवसेनेचे माजी सरपंच विनोद झाडगावकर, माजी सभापती व गावविकासचे निलेश लाड यांचा धक्कादायक पराभव झाला. 

कुवारबाव सरपंचपद निवडणूक निकाल व मिळालेली मते
मंंजिरी पाडळकर  - गावपॅनेल  -   1571 
साधना जांभेकर  - सेना - 1473
98 मतांनी विजयी 

कुवारबाव ग्रामपंचायत विजयी उमेदवार

प्रभाग 1
नरेश विलणकर ( गाव पॅनेल)  417 
सुनिला नलावडे ( गाव पॅनेल)    389 
रंजना विलणकर  ( सेना)  372 

प्रभाग 2 

प्राजक्ता चाळके ( गाव पॅनेल)  308
गणेश मांडवकर( गाव पॅनेल) 303
वैधही दुधवडकर ( सेना) 296 

प्रभाग 3
जिवन कोळवणकर सेना 300
स्नेहल वैशपायन  ( सेना)  288
सचिन कोतवडेकर ( गाव पॅनेल) 285

प्रभाग 4
गौरव पावस्कर ( गाव पॅनेल )- 429
रमेश चिकोडीकर ( गाव पॅनेल) 454
अनुश्री आपटे (गाव पॅनेल ) 436

प्रभाग 5
चेतन सावंत - सेना 364
रिया सागवेकर सेना - 331
साक्षी भुते सेना - 326

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com