रत्नागिरी लॉकडॉऊन अपडेट: पोलिसांची अंमलबजावणी; रस्त्यावर शुकशुकाट

रत्नागिरी लॉकडॉऊन अपडेट: पोलिसांची अंमलबजावणी; रस्त्यावर शुकशुकाट

रत्नागिरी : जिल्ह्यात वाढत्या कोरोना रुग्णसंख्येला (covid 19) जिल्ह्यात वाढत्या कोरोना रुग्णसंख्येला रोख घालण्यासाठी आजपासून कडक लॉकडॉऊनची(Lockdown) काटेकोर अंमलबजावणी सुरू झाली. 9 जून पर्यंत हा कडकडीत लाॅकडाऊन असेल. केवळ मेडीकल सेवा वगळता सर्व दुकानंही बंद आहेत. त्यामुळे रस्त्यावर पुर्णतः शुकशुकाट आहे. अत्यावश्यक वाहनांची किरकोळ वर्दळ सुरू आहे.शहरातील चेकपोस्ट देखील वाढवण्यात आली आहेत. जिल्ह्यात आरोग्य विषयक सुविधा, मेडिकल, कृषी विषयक दुकाने आणि बँक सुविधा सुरू राहणार आहेत. विनाकारण बाहेर पडल्यास कठोर कारवाई करण्यात येणार आहे. कडक लॉकडाऊनमुळे शहरातील रस्ते, बाजारपेठ ओस पडल्या होत्या. आठ दिवस अशीच अंमलबजावणी झाल्यास कोरोना संसर्ग रोखण्यास नक्कीच मदत होणार आहे.ratnagiri-lockdown-update-ratnagiri-kokan-news

रत्नागिरीत कोरोना रुग्णांची संख्या दिवसागणीक वाढताना दिसतेय. दिवसाला सरासरी 500 पेक्षा अधिक कोरोना बाधीत रुग्ण सापडताहेत. सध्याच्या घडीला 4 हजारांहून अधिक अॅक्टीव्ह रुग्ण रत्नागिरीत आहेत. रुग्णाची संख्या आटोक्यात आणण्यासाठी रत्नागिरी प्रशासनाकडून प्रयत्न सुरु आहेत.रुग्णांची वाढती संख्या जिल्हा प्रशासनासाठी डोकेदुखी ठरतेय.

रुग्ण संख्या आटोक्यात आणण्यासाठी आता जिल्हा प्रशासनाकडून 3 जून ते 9 जून पर्यंत कडकडीत लाॅडाऊन करण्यात आलाय. यात मेडीकल सेवेव्यतितीरीक्त कुणालाही मुभा देण्यात आलेली नाही. तर कृषी विषयक दुकानं केवळ दुपारी 2 वाजेपर्यंत सुरु राहणार आहेत. बाकी सर्व दुकानं बंद असणार आहेत. त्याचबरोबर रत्नागिरी जिल्ह्याच्या सिमा देखील आता बंद करण्यात आल्यात.अत्यावश्यक असेल त्यांनाच रत्नागिरीत प्रवेश मिळेल. मात्र, त्यासाठी कोरोना आरटीपीसीआर चाचणीचा रिपोर्ट जवळ ठेवावा लागले. अन्यथा कुणाला रत्नागिरीत प्रवेश करता येणार नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com