अमेरिकेसह आठ देशात हापूसची निर्यात 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 15 एप्रिल 2017

रत्नागिरी : देशभरातील स्थानिक मार्केटसह परदेशी बाजारपेठांचे दरवाजे हापूससाठी उघडल्याने वाशी मार्केटमधील दरांची घसरण थांबली आहे. युरोप अमेरिकेसह आठ देशांमध्ये निर्यात सुरू झाली आहे. वाशी बाजारात प्रतिदिन 60 हजार पेटी आंबा कोकणातून दाखल होत आहे. त्यातील 40 टक्‍के आंब्याची निर्यात केली जात आहे. परदेशी निर्यातीमुळे हापूसचे दर नियंत्रित झाल्याचा दावा वाशीतील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अधिकाऱ्यांनी केला आहे. 

स्थानिक बाजारेपठेबरोबरच परदेशातील निर्यात सुरू झाली आहे. सुरवातीला फक्‍त आखाती देशांमध्ये आंबा पाठविला जात होता. त्यानंतर दुबई, रशियातून मागणी आली. सर्वांच्याच नजरा युरोप, अमेरिका या देशातील निर्यातीकडे लागून राहिल्या होत्या. दोन दिवसांपूर्वी लासलगाव येथून पहिली कन्साईनमेंट रवाना झाली आहे. नवी मुंबई येथेही विकिरण प्रक्रियेची सुविधा आहे. त्याचाही फायदा बागायतदारांना होऊ शकतो. युरोपलाही आंबा रवाना झाला आहे. त्याचबरोबर जपान, सिंगापूर, दक्षिण कोरिया, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलियातील मार्केटमध्ये निर्यात सुरू झाली आहे. 

गतवर्षीपेक्षा दुप्पट उत्पादन या वर्षी शेतकऱ्यांच्या हाती लागले आहे. सध्या एक हजार ते अडीच हजार रुपये इतका दर पेटीला मिळत आहे. दर्जेदार आंब्याला चांगला दर मिळत असल्याने समाधान व्यक्‍त केले जात आहे. आवक वाढल्याने दरावर परिणाम होतो. या वर्षी उशिराने मार्केटमध्ये आंब्याची रेलचेल सुरू झाली. वातावरणातील बदलाने आंबा तयार होऊ लागला आहे. यावर्षीचा हंगाम 15 मेपर्यंत चालेल, असा अंदाज बागायतदारांकडून व्यक्‍त केला जात आहे. कोकणच्या हापूसबरोबरच कर्नाटकी आंबाही मुबलक आहे. एकाच बाजारपेठेवर भार पडू नये, यासाठी देशाच्या कानाकोपऱ्यात आंबा पोचविण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. त्यात पणनसह विविध यंत्रणांना यशही आले आहे. 

जुन्याच निकषांचा वापर 
बहुचर्चित युरोपची पहिली कन्साईमेंट बाष्पजल प्रक्रियेने पाठविण्यात आली असली, तरीही उष्णजलची यंत्रणाही सज्ज आहे; मात्र उष्णजलसाठी जुनेच निकष (48 अंश सेल्सिअसला 60 मिनिटे) वापरण्यात येणार आहेत. त्यामुळे दर्जाबाबत साशंकता व्यक्‍त केली जात आहे. कोकण कृषी विद्यापीठातर्फे केलेल्या संशोधनातून 47 अंश सेल्सिअसला 50 मिनिटांपर्यंत आंबा ठेवला तर त्याचा दर्जावर परिणाम होत नाही. याचा प्रस्ताव क्‍वारटाईन विभागाकडे अद्यापही पडून आहे.

Web Title: Ratnagiri Mangoes are being exported to USA