esakal | Ratnagiri : नवी पूररेषा लागू केल्यास आंदोलन
sakal

बोलून बातमी शोधा

Flood in Chiplun

Ratnagiri : नवी पूररेषा लागू केल्यास आंदोलन

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

चिपळूण : वादग्रस्त पूर रेषेसंदर्भात चिपळूण संघर्ष समितीने मुख्याधिकारी यांच्याकडे ४ हजार ८८० हरकती नोंदवण्यात आल्या. नवीन पूर रेषा लागू केल्यास चिपळूण संघर्ष समितीतर्फे आंदोलन केले जाईल, असा इशारा या समितीतर्फे देण्यात आला.

मुख्याधिकाऱ्यांना समितीतर्फे निवेदनही देण्यात आले. चिपळूण शहर, खेर्डी आणि लगतच्या परिसरातील काही गावांचे २२ जुलैला आलेल्या महापुरामध्ये प्रचंड नुकसान झाले. चिपळूण आणि खेर्डी बाजारपेठ या पुरामुळे नेस्तनाबूत झाली. जलसंपदा विभागाने जानेवारी ते फेब्रुवारी २०२१ मध्ये चिपळूण शहरात सर्वेक्षण करून निळी आणि लाल पूर रेषा आखली. याची पूर्वकल्पना स्थानिक प्रशासन, जनतेला देण्याची आवश्यकता जलसंपदा विभागाला वाटली नाही. पूररेषा लागू झाल्यास तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा देण्यात आला. अब्दुल शेख, आल्हाद यादव, सिद्धेश लाड, ओंकार रेडीज, किरण शेलार, मनोज जाधव, अनिकेत ओतरी, मल्लेश लकेश्री, विनायक पवार, अजय भालेकर, योगेश पवार आदी उपस्थित होते.

..ती स्थानिक जनता सहन करणार नाही

महापुरात झालेल्या नुकसानाची भरपाई करून स्थानिक जनतेला पुन्हा उभारी देणे, असा विनाशकारी महापूर पुन्हा चिपळूण परिसरात येऊ नये, यासाठी ठोस उपाययोजना करणे हे सरकारचे प्रथम कर्तव्य असताना, ते न करता जलसंपदा विभाग, महसूल विभाग पर्यायाने राज्य सरकार पूर रेषा लागू करण्यासाठी जी घाई गडबड करत आहेत, ती स्थानिक जनता सहन करणार नाही.

loading image
go to top