गुहागर तालुक्यात १४६ उमेदवार रिंगणात

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 15 ऑक्टोबर 2017

गुहागर - तालुक्‍यातील आरे वाकी पिंपळवट, कोतळूक, चिखली, जानवळे, सडे जांभारी, झोंबडी, धोपावे, पांगारी तर्फे हवेली, हेदवी, पाटपन्हाळे व पोमेंडी, खोडदे, वडद व साखरी त्रिशूळ या १४ ग्रामपंचायतींत सरपंचपदासाठी निवडणूक होत आहे, तर १३ ग्रामपंचायतींमध्ये २७ प्रभागात ५७ जागांसाठी ११४ उमेदवार निवडणूक लढवित आहेत.

वरवेली गावात सरपंच आणि ६ सदस्य बिनविरोध निवडून आल्याने केवळ एका प्रभागात निवडणूक होत आहे. आज सर्वच उमेदवारांनी कोणाला भेटल्यास अधिकची मते मिळू शकतील याचा आढावा घेतला. उघड प्रचार थांबला असला तरी वाडीवाडीत खाजगी बैठकांना जोर आला आहे. पाटपन्हाळे, हेदवी, धोपावे येथील लढती प्रतिष्ठेच्या बनल्या आहेत. वडद आणि साखरी त्रिशूळमध्ये ग्रामपंचायत सदस्य बिनविरोध निवडून आले.

Web Title: Ratnagiri New Grampanchayat Election