रेंज अभावी 227 गावातील पॉस मशिन वापर निष्प्रभ

राजेश कळंबटे
बुधवार, 23 मे 2018

रत्नागिरी - रास्त दराच्या धान्य दुकानातील वितरण व्यवस्थेत होणारा काळा बाजार रोखण्यासाठी पुरवठा विभागाने पॉस मशीनचा वापर जिल्ह्यात सुरु केला आहे. 929 मशिन ठिकठिकाणी लावण्यात आली आहेत; मात्र जिल्ह्याच्या दुर्गम भागात इंटरनेट नसल्यामुळे पॉसद्वारे वितरणात अडथळा निर्माण होत आहे. रेंज नसलेली 227 गावे आहेत. ही गैरसोय दूर करण्यासाठी पुरवठा विभागाकडून पावले उचलण्यात आली आहेत.

धान्याची उचल झाल्यानंतर संबंधित दुकानदाराने किती धान्य वितरीत केले, किती धान्य शिल्लक आहे, याची माहिती मिळत नाही. त्यात गैरव्यवहार होण्याची शक्यता असते. हा काळाबाजार रोखण्यासाठी पुरवठा विभागाने जूनपासून पॉस मशीनद्वारे धान्य वितरण सुरु केले. सुरवातीला दुकानदारांनी विरोध केला. पण बेसिक कमीशन 80 रुपये केल्याने दुकानदारांनी संमती दर्शविली आहे. जिल्ह्यात 929 पास मशीनचे वाटप केले आहे. डोंगराळ भाग असल्यामुळे इंटरनेटची समस्या निर्माण होते.

रेंज अभावी धान्य वितरणात अनियमितता होते का याची तपासणी करण्यात येत आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातून कमी धान्य वितरण का झाले, याची शहनिशा करण्यासाठी पुरवठा विभागाचे मंत्रालयीनस्तरावरील कक्ष अधिकारी म. गि. जोगदंड आणि सहायक कक्ष अधिकारी कौ. सु. राणे हे रत्नागिरीत दाखल झाले होते.

या अधिकार्‍यांनी पुरवठा विभागाच्या मुंबईतील अधिकार्‍यांनी ग्रामीण भागात जावून रेशन दुकानांची पाहणी केली. रेंज नसल्याचे निदर्शनाला आल्यानंतर वायफाय, मोबाईल हॉटस्पॉट, युएसबी हे पर्याय सुचविण्यात आले आहेत. ग्रामीण भागातील रेशन दुकानदारांना 150 पोर्टेबल अँन्टीना देण्यात आले असून ओएसएस कंपनीमार्फत वेगवेगपया कंपन्यांचे 303 कार्ड वितरण करण्यात आली आहेत.

रेंज मिळणार्‍या कंपनीची सीमकार्ड रेशन दुकानधारकांना दिली जाणार आहेत. तसेच वायफाय कनेक्टीव्हीटीचाही वापर करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

- जयकृष्ण फड, जिल्हा पुरवठा अधिकारी

Web Title: Ratnagiri New no use of POS machine due range problem in 227 villages