जिल्ह्यात कोकण रेल्वेच्या गाड्या उशिराने येत असल्याने फटका 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 27 ऑगस्ट 2017

रत्नागिरी - गणरायाच्या आगमनानंतर दोन दिवस मुसळधार पावसाने जिल्ह्याला झोडपले. त्यामुळे गणशेभक्‍तांच्या आनंदावर विरजण पडले. पावसामुळे बाहेर पडण्यापेक्षा घरातच राहणे पसंत केले होते. शासकीय सुटीचा वार असल्यामुळे काल शहरातील रस्त्यांवर शुकशुकाट होता. 

पावसामुळे कोकण रेल्वेच्या काही गाड्या उशिराने धावत होत्या. त्याचा फटका कोकणात येणाऱ्या काही चाकरमान्यांना बसला. 

सर्वाधिक पाऊस चिपळूणला 112 मिमी पडला. मंडणगड 47.30, दापोली 23, खेड 52, गुहागर 25.60, संगमेश्‍वर 72.70, रत्नागिरी 44, लांजा 98.60, राजापूर 62.50. श्रावण महिन्यात पावसाने विश्रांती घेतली होती. गेल्या पंधरात दिवसांत 311 मिमी पाऊस पडला. यावर्षीच्या मोसमात तुलनेत कमी पावसाची नोंद झाली आहे. आतापर्यंत 72 टक्‍के पाऊस झाला. गणेशोत्सवातील आठवडाभरात चांगला पाऊस पडेल हा हवामान विभागाचा अंदाज खरा ठरला आहे. गणपती आमगनाच्या दिवशी मुसळधार पावसाला सुरवात झाली. चिपळूण, संगमेश्‍वरला पावसाने झोडपले. आज रत्नागिरीसह सर्वच तालुक्‍यात संततधार सुरू आहे. 

मुंबईकर चाकरमान्यांसाठी कोकण रेल्वे मार्गावर सोडण्यात आलेल्या जादा गाड्यांना पावसाचा फटका बसला. वेग कमी केल्यामुळे गाड्या एक ते दोन तास उशिराने धावत होत्या. काही चाकरमानी सुट्या नसल्याने शनिवारी गावाकडे परतत होते. त्यांना याचा फटका बसला. पाऊस नसल्याने बळिराजाची चलबिचल सुरू होती. ती पावसाने थांबली. कडकडीत उन्हामुळे करप्याची भीती व्यक्‍त केली जात होती. काही ठिकाणी निळे भुंगेऱ्यांचा प्रादुर्भाव आढळून आला होता. त्याला सामोरे जाण्यासाठी कृषी विभागाने उपाययोजना सुचविल्या आहेत. पावसामुळे कीडरोगाला आपसूकच आळा बसणार आहे. 

- चार दिवसांची पावसाची आकडेवारी अशी (मि. मी) 
* 26 ऑगस्ट ः 59.86 
* 25 ऑगस्ट ः 24.51 
* 24 ऑगस्ट ः 12.53 
* 23 ऑगस्ट ः 9.10 

Web Title: ratnagiri new railway konkan railway