रत्नागिरी जिल्ह्यातील ११ घाट धोकादायक

राजेश शेळके
गुरुवार, 31 मे 2018

रत्नागिरी - जिल्ह्यातील राष्ट्रीय व राज्य महामार्गावरील अकरा घाट पावसाळ्यात प्रवासाच्या दृष्टीने डेंजर बनले आहेत. या मार्गावर सुमारे २२ दरडप्रवण ठिकाणे (दरड कोसळण्याची शक्‍यता) निश्‍चित केली आहेत. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन समितीच्या पाहणीत हे स्पष्ट झाले आहे. त्याअनुषंगाने वाहनधारकांनी सुरक्षित व काळजीपूर्वक प्रवास करावा, असे आवाहन प्रशासनाने केले असून ठोस उपाययोजना करण्याचे आदेश संबंधित खात्यांना दिले आहेत.

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने केलेल्या पाहणीमध्ये संभाव्य दरडी कोसळणारी ठिकाणे निश्‍चित केली आहेत. त्यात जिल्ह्यात मुंबई-गोवा या राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. मोठ-मोठे डोंगर कापून रस्ता केला जात आहे. त्यामुळे आणखी धोका निर्माण झाला आहे. 

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन समितीने घाटांमधील दरडप्रवण क्षेत्र निश्‍चित केली आहेत. त्याबाबतची खबरदारी घेतली 
आहे. वाहनधारकांनी सावधगिरीने वाहने चालवणे हाच यावरील उपाय आहे. 
- विनोद चव्हाण,
उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, रत्नागिरी

आठवडाभरात मॉन्सून जिल्ह्यात दाखल होण्याची शक्‍यता आहे. खबरदारी म्हणून जिल्हा प्रशानाने महामार्गावर सावधगिरीने वाहने चालविण्याचे आवाहन वाहनधारकांना केले आहे. जिल्ह्यातील ११ घाटांमध्ये २२ दरडप्रवण ठिकाणे आहेत. या धोकादायक ठिकाणावरील झोडे तोडणे, बाजूचे खड्डे बुजवणे, पुलांची काळजी घेणे, रस्त्यावरील माती साफ करणे, सूचना फलक लावण्याचे आदेश जिल्हाधिकारी प्रदीप पी. यांनी दिले आहेत. ठोस उपाययोजनेबाबत लवकरच बैठक होणार आहे. 

जिल्ह्यातील अकरा घाट
भोस्ते घाट, कामथे घाट, निवळी, देवधे, वाटूळ, आंबा, कुंभार्ली, कशेडी, परशुराम, आगवे, पालपेणी या घाटांमध्ये २२ दरडप्रवण ठिकाणे आहेत. 

Web Title: Ratnagiri News 11 Danger zone in district