चोरट्यांकडून १२ घरफोड्या

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 27 जुलै 2018

चिपळूण - घरफोड्या केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या चौघांच्या टोळीने चिपळूणसह वेगवेगळ्या १२ ठिकाणी केलेल्या घरफोड्यांची कबुली दिली आहे. चिपळुणातील २ आणि ठाणे ग्रामीण पोलिस ठाण्याच्या हद्दीत केलेल्या घरफोडीतील ७ लाख ३७ हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.

चिपळूण - घरफोड्या केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या चौघांच्या टोळीने चिपळूणसह वेगवेगळ्या १२ ठिकाणी केलेल्या घरफोड्यांची कबुली दिली आहे. चिपळुणातील २ आणि ठाणे ग्रामीण पोलिस ठाण्याच्या हद्दीत केलेल्या घरफोडीतील ७ लाख ३७ हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. त्याशिवाय चारचाकी जप्त केली आहे. टोळीतील नासिर खान इसाक खान पठाण, मुकेश भागोजी बाळसराफ यांचा अनेक घरफोड्यांमध्ये समावेश असल्याचे चौकशीतून समोर आले आहे. 

चिपळूण व खेडमध्ये घरफोड्या करून पळालेल्या टोळीचा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा रत्नागिरी व चिपळूण पोलिसांनी पेण (जि. रायगड) येथे शोध लावला. टोळीतील ज्ञानेश्वर अप्पाबुराई शेट्टी, नासिर खान इसाक खान पठाण, मुकेश भागोजी बाळसराफ, रवी रामचंद्र शेट्टीयार हे ठाणे ग्रामीण पोलिस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या गणेशपूर येथे ३ लाखांची घरफोडी करून पेण येथे आले असता स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा रत्नागिरी व चिपळूणच्या पोलिसांनी त्यांना रंगेहात पकडले. त्यांच्या चौकशी केल्यानंतर त्यांनी चिपळूण, खेड, ठाणे, कल्याण, मुंबई, अंबरनाथ, बदलापूर, सातारा, बेळगाव, गुजरात, सुरत, सातारा अशा वेगवेगळ्या ठिकाणी घरफोड्या केल्याची कबुली दिली. 

संशयितांवर त्या त्या ठिकाणी घरफोडीचे गुन्हेही दाखल आहेत. गेल्या महिन्यात चिपळुणात झालेल्या घरफोडीतील तीन लाख ३७ हजार सोने, १२ हजारांची चांदीसह एकूण साडेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त केला. एप्रिल २००३ मध्ये खेंड येथील मोबाईल दुकानातून याच टोळीने रोख रक्कम चोरल्याची कबुली पोलिसांना दिली. 

आणखी दोघांचा शोध
नासिर खान इसाक खान पठाण याने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार चिपळुणात पठाण याच्या मदतीने अन्य दोघांनी काही ठिकाणी घरफोड्या केल्या आहेत. त्या दोघांचा चिपळूण पोलिस व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांकडून शोध सुरू आहे. 

टोळीतील चारही संशयितांना अनेक ठिकाणी घरफोड्या केल्या आहेत. प्रत्येकावर किमान पाच ते सहा गुन्हे आहेत. गुन्हे दाखल असलेल्या पोलिस ठाण्याकडे चौकशीसाठी त्यांना वर्ग केले जाणार आहे.
- शिरीष सासणे,
पोलिस निरीक्षक, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा

Web Title: Ratnagiri News 12 housebreaker from thieves