रत्नागिरी, सिंधुदुर्गातील चार किल्ल्यांच्या संवर्धनासाठी 17 कोटी

राजेश शेळके
शुक्रवार, 27 जुलै 2018

रत्नागिरी - जिल्ह्यातील चार राज्य संरक्षित झालेल्या गड, किल्ल्यांच्या मजबुतीकरणावर शासनाने जोर दिला आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चार किल्ल्यांचा यामध्ये समावेश आहे. किल्ल्यांच्या संवर्धनासाठी 17 कोटी रुपये मंजूर झाले असून कामाला सुरवात झाली आहे.

रत्नागिरी - जिल्ह्यातील चार राज्य संरक्षित झालेल्या गड, किल्ल्यांच्या मजबुतीकरणावर शासनाने जोर दिला आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चार किल्ल्यांचा यामध्ये समावेश आहे. किल्ल्यांच्या संवर्धनासाठी 17 कोटी रुपये मंजूर झाले असून कामाला सुरवात झाली आहे. जुन्या पद्धतीत चुन्यामध्ये हे बांधकाम करून जतन केले जात आहे. मोठे दगडही उपलब्ध होत नसल्याने कामात अडथळा येत आहे. 

इतिहासाच्या पाऊलखुणा म्हणून जिल्ह्यातील मोठ्या प्रमाणात गड, किल्ले आहेत. सर्व ऋतुमध्ये हे किल्ले तग धरून आजही मानाने उभे आहेत. काही वर्षांपासून मात्र या किल्ल्यांची पडझड सुरू झाली आहे. त्याकडे वेळीच लक्ष न दिल्याने किल्ल्याची तटबंदीपासून मूळ ढाचाही अनेक ठिकाणी ढासळला आहे.

जिल्ह्यातील साधारण सत्तावीस किल्ले आहे. शासनाने रत्नागिरीतील बाणकोट किल्ला, पूर्णगड, यशवंतगड आणि सिंधुदुर्ग येथील भरतगड हे किल्ले राज्य संरक्षित करण्यात आले आहेत. राज्य संरक्षित झाल्याने त्यांच्या संवर्धनाला सुरवात झाली आहे. पूर्वींच्या किल्ल्याला मोठे दगड आहेत. तसेच तटबंदीचे आणि किल्ल्यांचे काम चुना, करंज आदींचे मिश्रण करून ते वापरले जात होते. त्याला मजबुती येण्यासाठी साधारण 10 दिवस लागतात. तीच पद्धत यावेळी वापरण्यात येणार आहे. 

राज्य संरक्षित झालेल्या या चारही किल्ल्यांच्या संवर्धनासाठी शासनाने निधी मंजूर करून कामाला सुरवात केली आहे. पुरातत्त्व विभागाने याला दुजोरा दिला. बाणकोट किल्ल्यासाठी 2 कोटी, तर पूर्णगड, यशवंतगड आणि भरतगडासाठी प्रत्येकी 5 कोटी रुपये मंजूर झाले आहे. दोन वर्षांमध्ये हे काम पूर्ण होण्याची अपेक्षा असल्याने त्यानंतर या गड, किल्ल्याचे रुपडे पालटणार आहे. 

 

Web Title: Ratnagiri News 17 cores to fort conservation in Konkan