मालगुंडमध्ये पर्यटकांसाठी 24 तास कॅफे

मकरंद पटवर्धन
रविवार, 25 मार्च 2018

रत्नागिरी - तालुक्यातील गणपतीपुळे, मालगुंड या आंतरराष्ट्रीय पर्यटनस्थळी पर्यटक कोणत्याही वेळी येत असतात. अनेकदा रात्री, अपरात्री आलेल्या पर्यटकांना कॉफी, स्नॅक्स उपलब्ध करून देणे शक्य होत नाही. याकरिता डॉ. निशिगंधा पोंक्षे यांच्या ट्रँक्विलिटी बीच रिसॉर्टने व्हॅलेंटिनो बीच कॅफे सुरू केला आहे. हा कॅफे 24 तास चालू राहणार आहे. पर्यटकांच्या सोयीसाठी हा कॅफे चालू केल्याची माहिती डॉ. पोंक्षे यांनी ‘सकाळ’ला दिली.

ट्रँक्विलिटी बीच रिसॉर्ट मालगुंड येथे 9 वर्षे सुरू आहे. रविवारी दहाव्या वर्षांत पदार्पण करताना एका छोटेखानी कार्यक्रमात पर्यटकांसाठी नवनव्या योजना डॉ. पोेंक्षे यांनी जाहीर केल्या.

डॉ. पोंक्षे यांनी सांगितले की, घरच्यांच्या पूर्ण सहकार्यामुळेच ट्रँक्विलिटीने नवी भरारी घेतली आहे. ‘व्हॅलेंटिनो बीच कॅफे’ 24 तास चालू राहणार असून कधीही येणार्‍या पर्यटकांना समुद्रकिनारी बसून कॉफी, स्नॅक्सचा आस्वाद घेता येईल. रेस्टॉरंट व हॉटेल बुकिंगकरिता मेंबरशिप कार्डद्वारे सवलती देण्यात येणार आहेत. सुखनिवांतमध्ये एका खोलीत दोन-तीन ज्येष्ठांना किमान 2 ते 90 दिवसांपर्यंत निवास, ब्रेकफास्ट, जेवण व प्रासंगिक वैद्यकीय देखरेख अशा सर्व सुविधा दिल्या जातील.

नगराध्यक्ष राहुल पंडित यांनी सांगितले की, रत्नागिरीला मँगो सिटी बनवण्यासाठी गतवर्षीपासून जाणीवपूर्वक प्रयत्न केले जात आहेत. त्यात आता डॉ. निशिगंधा पोंक्षे यांच्या ट्रँक्विलिटी बीच रिसॉर्टच्या नव्या संकल्पनांची भर पडली आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी सुखनिवांत, 24 तास व्हॅलेंटिनो बीच कॅफे आणि मूव्ही विथ कँडल डिनर या संकल्पनांद्वारे पर्यटकांना सुवर्णसंधी मिळेल. रत्नागिरीत 19 लाख पर्यटकांची नोंद गतवर्षी झाली. पर्यटक राहिला की प्रत्येकी किमान 1000 ते 1200 रुपये स्थानिकांना विविध माध्यमांतून मिळतात. गणपतीपुळ्यातला पर्यटक रत्नागिरीत राहिला पाहिजे याकरिता मँगो सिटीच्या ग्रुपतर्फे विविध प्रयत्न केले जात आहेत. याकरिता कातळशिल्पांचे शोधकर्ते सुधीर रिसबूड, मीडिया, हॉटेल असोसिएशन आदींचे सहकार्य मिळत आहे.

डॉ. नितीन दाढे यांनी नव्या पॅकेजिसची माहिती सांगितली. सॅटर्डे बोनान्झा पॅकेजमध्ये सॅटर्डे नाईट मूव्ही विथ कँडल डिनर किंवा कारमध्ये बसूनच चित्रपट पहात जेवण घेता येईल. आरोग्यदायी पर्यटनात दरमहा तीन दिवसांचे आरोग्यशिबिर घेतले जाईल. बायकर्स, रायडर्स, सायकलस्वारांना समुद्रकिनार्‍यावर टेंट लावण्याकरिता जागा उपलब्ध करुन दिली जाईल. यानंतर चार्ली चॅप्लिनचा मूकपट पाहताना पर्यटकांनी जेवणाचा आस्वाद घेतला. विवेक तांबे यांनी सूत्रसंचालन केले.

Web Title: Ratnagiri News 24 hours cafe in Malgund