लांज्यातील बल्लाल गणेश देवस्थान परिसरातील 300 काजूची झाडे आगीत खाक

रवींद्र साळवी
गुरुवार, 18 जानेवारी 2018

लांजा - प्रभानवल्ली येथील प्रसिध्द बल्लाल गणेश देवस्थानच्या परिसरात बुधवारी अज्ञाताने आग लावल्याने देवस्थानच्या मालकीची किमान तीनशे काजुची झाडे जळुन खाक झाली.

लांजा - प्रभानवल्ली येथील प्रसिध्द बल्लाल गणेश देवस्थानच्या परिसरात बुधवारी अज्ञाताने आग लावल्याने देवस्थानच्या मालकीची किमान तीनशे काजुची झाडे जळुन खाक झाली.

या घटनेत देवस्थानचे लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे. कृषी व महसुल विभागाकडुन याचा पंचनामा आज करण्यात आला. नुकसान भरपाईसह आग लावणार्‍याला व्यक्तीस पकडण्याची मागणी देवस्थान प्रशासनाकडुन शासनाकडे करण्यात येत आहे. बांध असल्याने ही आग मंदिरापर्यंत पोहोचू शकली नाही. त्यामुळे मंदिराचे नुकसान टळले. 

छञपती संभाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेले बल्लाल गणेश देवस्थान मंदीर तालुक्यातील प्रभानवल्ली येथे आहे. वस्तीपासुन गावच्या जंगलात वसलेल्या या देवस्थानची मंदीरात लागुन किमान पाच एकरची जमीन आहे. या जमिनीत मंदीर प्रशासनाने काही वर्षांपूर्वी काजुची लागवड केली होती. या काजूपासून देवस्थानाला लाखोंचे उत्पादन मिळत होते. या आगीत ही सर्व झाडे खाक झाली.

Web Title: Ratnagiri News 300 Cashew nut plants burnt in Lanja Taluka