रत्नागिरीतील 31 बीच होणार संरक्षित 

राजेश शेळके
सोमवार, 4 जून 2018

रत्नागिरी - जिल्ह्यातील किनारा सुरक्षेच्यादृष्टीने जिल्हा प्रशासनाने आज तातडीची बैठक घेतली. ग्रामीण भागातील 13 आणि शहरी भागातील 1 अशी जिल्ह्यातील 14 बीच निश्‍चित करण्यात आले आहेत. 

रत्नागिरी - जिल्ह्यातील किनारा सुरक्षेच्यादृष्टीने जिल्हा प्रशासनाने आज तातडीची बैठक घेतली. ग्रामीण भागातील 13 आणि शहरी भागातील 1 अशी जिल्ह्यातील 14 बीच निश्‍चित करण्यात आले आहेत. 

जिल्हा परिषद आणि ग्रामीण विकास विभागावर याची जबाबदारी टाकली आहे. कोकण पर्यटन विकासाच्या माध्यमातून त्यासाठी 54 लाख मंजूर आहेत. टेहेळणी मनोरे, लाइफ गार्ड, छोटी बोट आदी वस्तू देण्यात येणार आहेत. या व्यतिरिक्त अन्य 17 बीच संरक्षित करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. 

  • जीवरक्षकांना 6 हजारांवरून 10 हजार वेतन वाढ
  • सूर्यास्तानंतर समुद्रात उतरण्यास बंदी
  • पाण्याला मारणार्‍या करंटवर खासगी संस्थेकडून अभ्यास
  • जिल्हा रक्षकांना गोव्याच्या संस्थेकडून प्रशिक्षण

तालुक्यातील आरे-वारे समुद्र किनारी एकाच बोरिवलीतील डिसोझा या कुटुंबातील 5 जणांचा बुडून मृत्यू झाला. याची पुनरावृत्ती टाळण्यासाठी जिल्हा प्रशासनाने खबरदारी घेतील. शहरी भागातील बिचची जबाबदारी पालिका किंवा नगरपंचायतींवर तर ग्रामीण भागातील बिचची जबाबदारी जिल्हा परिषद आणि ग्रामीण विकास विभागावर निश्‍चित केले आहे. पर्यटन विभागाचाही यात समावेश आहे. या विभागांकडून किनार सुरक्षेच्या उपाययोजना करण्याची गरज होती. मात्र त्याकडे दुर्लक्ष झाल्याचे या घटनांवरून स्पष्ट होते.

काही गतिमान निर्णय

  • जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात समुद्र किनार्‍यावर येणार्‍या पर्यटकांच्या संरक्षणासाठी 54 लाखातून साहित्य खरेदी केले जाणार.
  • टेहेळणी मनोरे उभारणे, जीवरक्षक नेमणे, बुडणार्‍यांना तत्काळ मदत मिळावी यासाठी छोटी बोट घेणे, सेफ आणि डेंजर झोन तयार करणे, दोरी पासून अन्य साहित्याचा यामध्ये समोवश. 
  • या 14 व्यतिरिक्त कर्धे, लाडघर, आरे, वॉच टॉवर उभारण्यात येणार.
  • वेळणे, हर्णै, मुरूड, काजीरभाटी, आदीचा बिचच्या सुरक्षेसाठी प्रस्ताव घेणार  

आरे-वारे दुर्घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी किनारा सुरक्षेसाठी जिल्ह्यातील 31 बीच निश्‍चित केले. सुरक्षेसाठी उपाययोजना केल्या जाणार आहेत. कार्यवाही झाली की नाही, यासाठी लवकरच पुन्हा बैठक घेतली जाईल. 

- अभिजित घोरपडे, निवासी उपजिल्हाधिकारी रत्नागिरी

Web Title: Ratnagiri News 31 sea beach security issue