स्वच्छ सर्वेक्षण मोहिमेत रत्नागिरीला पाच कोटीचे पारितोषिक

राजेश कळंबटे
रविवार, 24 जून 2018

रत्नागिरी - ’स्वच्छ सर्वेक्षण 2018’ च्या मोहिमेत रत्नागिरी पालिकेने बाजी मारत 5 कोटीचे पारितोषीक पटकाविले. संपूर्ण भारतात चाळीसावा, राज्यात चोविसावा तर पश्चिम भारतात सव्वीसावा क्रमांक मिळविला, अशी माहिती नगराध्यक्ष राहूल पंडित यांनी पत्रकार परिषदेत दिली.

रत्नागिरी - ’स्वच्छ सर्वेक्षण 2018’ च्या मोहिमेत रत्नागिरी पालिकेने बाजी मारत 5 कोटीचे पारितोषीक पटकाविले. संपूर्ण भारतात चाळीसावा, राज्यात चोविसावा तर पश्चिम भारतात सव्वीसावा क्रमांक मिळविला, अशी माहिती नगराध्यक्ष राहूल पंडित यांनी पत्रकार परिषदेत दिली.

फेब्रुवारी, मार्चमध्ये संपूर्ण भारतातील शहरांचा सर्व्हे करण्यात आला होता. एक लाख लोकसंख्येच्या प्रवर्गात रत्नागिरी पालिकेने स्वच्छतेत चांगले काम केले आहे. स्वच्छ सर्वेक्षण अभियानात सहभागी नागरिकांना उद्युक्त करावे, यासाठी केंद्र शासनाने देशातील 4041 स्थानिक स्वराज्य संस्थांचे स्वच्छतेच्या अंगाने मूल्यमापन केले होते. हे यश नागरिकांचे असून त्यांच्या सहकार्यामुळे मिळाले आहे. परिक्षणात तीन हजार गुण ठेवण्यात आले होते. त्यात नागरिकांचा प्रतिसाद आणि कचर्‍याचे विलगीकरणाला चांगले गुण मिळाले; मात्र कचर्‍यावरील प्रक्रियेच्या परिक्षणात रत्नागिरी मागे आहे. कचर्‍यावरील प्रक्रियेच्या मुद्द्यात रत्नागिरीला कमी गुण मिळाले आहेत. दांडेआडोमची जागेवरुन न्यायालयीन प्रक्रियेत तर एमआयडीसीतील जागा तांत्रिक अडचणीत सापडली आहे. ती कमी भरुन काढत येत्या दोन महिन्यात स्वच्छतेच्या देशातील स्टार रेटींगमध्ये अव्वल स्थानक पटकाविण्याचा निर्धार केल्याचे नगराध्यक्ष राहूल पंडित यांनी सांगितले.

जागेचा शोध सुरु असून लवकरच त्यात यश येईल. घरा घरातील कचरा गोळा करण्यासाठी नवीन आठ ते दहा गाड्या खरेदी करण्यात येणार आहेत.

शहरातील सोसायटींसाठी कचरा विल्हेवाट करण्यासाठीची स्पर्धा घेण्यात येणार आहे. शुन्य कचरा घंटागाडीत देणार्‍या सोसायटींसाठी करात सवलत दिली जाणार आहे. स्वच्छतेत अव्वल स्थान मिळविणार्‍या पालिकांनी सुमारे 25 टक्के करात सवलत दिली आहे, असे श्री. पंडीत यांनी सांगितले.

सध्या पालिकेला मिळालेल्या पाच कोटी रुपयांचे नियोजन योग्य प्रकारे केले जाईल अशी ग्वाही आमदार उदय सामंत यांनी दिली.

Web Title: Ratnagiri News 5 cores price to Ratnagiri