धनदांडगे, पुढारी, अधिकारी ‘आयुष्यमान’चे लाभार्थी

नागेश पाटील
सोमवार, 21 मे 2018

चिपळूण - आयुष्यमान भारत राष्ट्रीय स्वास्थ्य  सुरक्षा योजनेत निवड झालेल्या लाभार्थ्यांच्या नावाचे वाचन करताच आगडोंब उसळू लागला आहे. निवृत्तीवेतनधारक, जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्यांसह सरपंचाची नावेही यात समाविष्ट आहेत. मात्र अनेक गरजू लाभार्थ्यांची नावे नसल्याने गावागावांत वादविवादास सुरवात झाली आहे.

२०११ मध्ये सामाजिक, आर्थिक, जातीनिहाय जनगणना झाली. याआधारे आयुष्यमान भारत राष्ट्रीय सुरक्षा स्वास्थ योजनेतील लाभार्थ्यांची निवड झाली. जिल्ह्यात सुमारे ८४ हजार, तर चिपळूण तालुक्‍यातील सुमारे १६ हजार लाभार्थ्यांची निवड झाली. आर्थिकदृष्ट्या सक्षम लोकप्रतिनिधीसह दुमजली बंगले असलेल्यांचाही समावेश आहे. मात्र गरजू, भूमिहीन व आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या लाभार्थ्यांचा समावेश नाही. तालुक्‍यातील मोरवणे येथे ४० टक्के सेवानिवृत्त असल्याचे उघड झाले. यावरून गावात हंगामा झाला. पुन्हा सर्वेक्षण करण्याची मागणी झाली. कामथे येथील ग्रामसभेत आमची नावे नसताना यादीचे वाचन कशासाठी केलेत, अशी विचारणा करीत शासकीय कर्मचाऱ्यांशी हमरीतुमरी झाली. याबाबत पंचायत समितीकडे तक्रारीही झाल्या. 

प्रत्येक गावात गरजू, आर्थिक दुर्बल घटकांचा समावेश झालेला नाही. हवेली बांधलेल्या समावेश भूमिहीन पडीक घर असलेल्याचा समावेश नाही. फेरसर्वेक्षण न झाल्यास आर्थिक दुर्बल घटकाना वंचित राहावे लागेल. 
- राकेश शिंदे,
गटनेता, पंचायत समिती चिपळूण

Web Title: Ratnagiri News aaushyaman Beneficiary issue