दाभोळेजवळ ट्रक - टेंपो ट्रॅव्हलरमध्ये अपघात

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 21 जून 2018

देवरुख - रत्नागिरी - कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गावर आज सकाळी  दाभोळे जवळ ट्रक आणि टेंपो ट्रॅव्हलरमध्ये झालेल्या अपघातात ५ जण जखमी झाले. सर्व जखमी रत्नागिरीतील असुन उपचार करून त्यांना घरी पाठवण्यात आले.

अपघातातील टेंपो ट्रॅव्हलर रत्नागिरी ते गाणगापूर असा प्रवास करत होती तर ट्रक साखरप्याहुन रत्नागिरीकडे निघाला होता. दोन्ही वाहने दाभोळे येथील वळणावर आल्यावर दोघांची धडक झाली. यात ट्रॅव्हलरमधील सुनिता दत्तात्रय कुरटे (६९), गोपाळ शामराव कुलकर्णी (७२),सुरेखा गोपाळ कुलकर्णी (५९),वैशाली विजय सावंत (६८), सुनिल शांताराम सावंत (५१, सर्व राहणार रत्नागिरी) हे जखमी झाले. सर्वाना स्थानिक ग्रामस्थांनी साखरपा  प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले. उपचार करून सर्वाना घरी पाठवण्यात आले. याबाबत साखरपा पोलिस दुरक्षेत्रात नोंद करण्याचे काम सुरु आहे.

Web Title: Ratnagiri News accident near Dabhole